बल्लारपूर येथे तलवारीसह एकास अटक

80
बल्लारपूर येथे तलवारीसह एकास अटक

बल्लारपूर येथे तलवारीसह एकास अटक

बल्लारपूर येथे तलवारीसह एकास अटक

• आतापर्यत सहा तलवारी जप्त
• बल्लारपूर पोलिसांची कारवाई

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

विसापूर : 22 सप्टेंबर
सण आणि उत्सव या कालावधीत कायदा व
सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, म्हणून पोलिसांनी
धाडसत्र मोहिम हाती घेतली आहे. शनिवारी रात्री
बल्लारपूर शहरातील सुभाष वार्डातून एका
आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी तलवारीसह अटक
केली. आतापर्यंत पोलिसांनी ठाणे हद्दीतील 6
जणांना तलवारसह अटक केली. हिरा ईश्वर
बहुरिया असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
बल्लारपूर शहरातील सुभाष वार्ड मधील जोक्कु
नाला भागातील हिरा बहुरिया या नावाच्या
इसमाच्या घरी तलवार शस्त्र असल्याची माहिती
पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे धाड
टाकून घराची झडती घेतली असता, त्याच्याघरी
तलवार आढळून आली. आरोपीविरूद्ध आर्म
अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,
अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय
पोलिस अधिकारी दिपक साखरे यांच्या
मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनील गाडे,
उपनिरीक्षक गोविंद चाटे, उपनिरीक्षक हुसेन शाह
यांच्या पथकाने केली.