हिंगणघाट येथे राष्ट्रीय बालिका दिवस साजरा.

हिंगणघाट:- आंतरराष्ट्रीय पातळीवर बालिका दिन साजरा करण्याचा उपक्रम एका स्वयंसेवी संस्था ‘प्लॅन इंटरनेशनल’ प्रकल्प’अंतर्गत सर्वप्रथम करण्यात आला. या संस्थेने “कारण मी एक मुलगी” नावाची मोहीमदेखील सुरू केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर हा दिन साजरा करण्यात आला.या उपक्रमाला समोर ठेऊन भारतात २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी इंदिरा गांधींना स्त्री शक्तीचे रूप म्हणून त्यांची आठवण केली जाते. याच दिवशी इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधानच्या असणाऱ्या खुर्चीवर बसल्या होत्या. म्हणून हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आला.
भारत सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी बर्याच योजना राबविल्या असून त्या अंतर्गत “बेटी बचाओ व बेटी पढाओ” ही एक उल्लेखनीय योजना आहे.याशिवाय केंद्र व राज्य सरकार इतर महत्वाच्या योजनाही सुरू करत आहेत.भारतातही दरवर्षी 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका बालदिन साजरा केला जातो.