कोलाड आंबेवाडी बाजारपेठेतील बनारस जनरल स्टोअर्स दुकानात चोरी,
एक लाख ७५ ते २ लाखापर्यंतच्या किंमतीचा सिगारेटचा माल रोख १६०० केले लपांस.
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
मुंबई-गोवा हायवेवरील कोलाड आंबेवाडी नाका बाजारपेठेतील तटकरे पार्क येथील बनारस जनरल स्टोअर्सचे मालक फुलंचद जैस्वाल यांच्या दुकानातुन अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत रुपये किमतीचा सिगारेटचा माल तसेच १५००ते १६०० रोकड चिल्लर दुकानाचा लॉक व स्वेटर तोडून चोरट्यांनी मुद्देमासाहित लंपास केला.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे कि मंगळवार दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यरात्री आंबेवाडी बाजारपेठेतील बनारस जनरल स्टोअर्सचे मालक फुलचंद जैस्वाल यांच्या शेटरचे लॉक तोडून दुकानातुन फोर्सकर,क्रश, गोल्डफ्लॅक, इंडिमेंट,ऍडव्हान्स,क्लोमिक्स,लाईट,डबल बटण, गोल्डफ्लॅक किंग,लाईट,क्लासिक आईसबर्ड, माईल्ड,अशा विविध प्रकारच्या सिगारेटचा अंदाजे एक लाख ७५ हजार ते २ लाखा पर्यंतचा माल तसेच १५०० ते १६०० रुपयांची चिल्लर चोरट्यांनी लंपास केली आहे.विशेष म्हणजेच गेली दोन महिन्यांपासून कोलाड ते वाकण दरम्यान ७ ते ८ दुकानात चोरी झाली असुन या सर्वच दुकानातुन फक्त सिगारेटचा माल व रोख रक्कम चोरीला जात असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
तर सदरच्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरील घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून या बाबत कोलाड पोलिस निरिक्षक नितिन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असल्याचे समजते.