रायगड मधून 333 ज्येष्ठ नागरिक निघाले तीर्थ दर्शनाला

91
रायगड मधून 333 ज्येष्ठ नागरिक निघाले तीर्थ दर्शनाला

रायगड मधून 333 ज्येष्ठ नागरिक निघाले तीर्थ दर्शनाला

रायगड मधून 333 ज्येष्ठ नागरिक निघाले तीर्थ दर्शनाला
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पनवेल ,मुरुड ,तळा आणि महाड तालुक्यातील 333 ज्येष्ठ नागरिक हे तीर्थ दर्शनासाठी जाणार आहेत.त्यांचे अर्ज मंजूर झाले असून प्रवासाचे नियोजन करण्यात येत असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी सांगितले.
शासनाने साठ वर्षे व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी तीर्थ दर्शनासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली असून याचा लाभ घ्यावा असेही आव्हान त्यांनी केले आहे.
या योजनेत भारतातील 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांच्या समावेश आहे. या रायगड मधील पनवेल तालुक्यातील श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी आयोध्या साठी 139, मुरुड मधून पांडुरंगाच्या दर्शनासाठी 74, तळा येथून पंढरपूर साठी 32, महाड तालुक्यातील गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला जाण्यासाठी 34, असे 279 आणि त्यांच्यासोबत सहायक असे 333 जणांचे नियोजन करण्यात येत आहे.
*समाजकल्याणकडे ३९१ अर्ज*
रायगड जिल्ह्यातून तीर्थ दर्शनासाठी ३९१ ज्येष्ठांनी समाज कल्याण विभागाकडे अर्ज केले होते. यापैकी 279 जणांचे अर्ज मंजूर केले असून त्यांना सहायक मिळून 333 जण तीर्थ पर्यटन करणार आहेत.
‘391 अर्ज प्राप्त झाले होते वयाच्या आरोग्याचा प्रश्न विचारत घेता काही अर्ज पात्र ठरवले आहेत. मंजूर अर्ज पालकमंत्री यांच्याकडे पाठवले आहेत. त्यांच्या बस प्रवासासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी मार्फत प्रक्रिया सुरू केली आहे.आयोध्या साठी पूर्ण रेल्वे असल्याने इतर जिल्ह्यांचे मिळून जिल्ह्यातील पात्र नागरिकांना सोबत पाठविले जाणार आहे.
*-सुनील जाधव, सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग रायगड*