सर्दी आणि खोकल्याचा ‘ताप’

107
सर्दी आणि खोकल्याचा 'ताप'

सर्दी आणि खोकल्याचा ‘ताप’

जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णाची गर्दी

सर्दी आणि खोकल्याचा 'ताप'
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील वातावरणात सतत होणाऱ्या बदलाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होत असून सर्दी ,ताप ,खोकल्याच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.यामध्ये आता डेंग्यू आणि मलेरियाचीही रुग्ण आढळत असल्याने आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी मध्ये रुग्णांची संख्या वाढलेली आहे.

काही दिवस पावसाच्या सरी कोसळत होत्या तर काही वेळ कडकडून उन पडले होते. वातावरणातील या बदलामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. सध्या सर्दी, खोकला ताप अंगदुखी यासारख्या आजाराने अनेकांना ग्रासले आहे.गेला आठवड्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडी मध्ये ताप, सर्दी आणि खोकल्याचे दहापेक्षा कमी रुग्ण उपचारासाठी येत होते.

*कशी घेता येईल दक्षता?*
पाणी साठवण टाके नियमित स्वच्छ कराव्यात घरच्या आसपास पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. झुडपे अनावश्यक गवत वाढल्यास ते काढून घ्यावे घरात स्वच्छता ठेवावी. कचऱ्याची वेळीच बिले वाट लावावी पांघरून स्वच्छ आणि कोरड्या जागेत ठेवावे.

*डेंग्यू आणि मलेरियाचे ही रुग्ण*
आता जिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्या 35 पर्यंत आहे. अन्य सरकारी आणि खाजगी रुग्णालयातही या आजारांची रुग्णसंख्या वाढली आहे.डेंगू आणि मलेरिया शाही रुग्णांची संख्या वाढली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
“बदलत्या वातावरणात डासांची पैदासी वाढली असून डेंगू मलेरियाला ही निमंत्रण मिळत आहे.मागील काही महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार घेतलेला डेंगू आणि मलेरियाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. ताप ,सर्दी आणि खोकल्याचा रुग्णांची संख्या ही अधिक आहे.
*-ज्ञानेश्वर अडसळे, वैद्यकीय अधिकारी*

“रायगड जिल्हा सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू असल्याने साथीच्या आजारांची सध्या डोक वर काढले आहे. प्रत्येक घरात एक ते दोघेजण या आजाराने ग्रस्त आहेत.गेल्या चार दिवसांपासून मला सर्दी ताप खोकल्याचा त्रास होत आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार केले.
* समाधान पाटील, रुग्ण*
*दररोज पंधरा रुग्ण*
काही दिवसांपासून सकाळी अचानक वाढणारे तापमान आणि त्यानंतर पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. या वातावरणामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ताप ,सर्दी, खोकला ,डोकेदुखी कावीळ, अतिसार व घशाच्या आजाराने गस्त असलेले 15 रुग्ण दररोज दवाखान्यात उपचारासाठी येत आहेत, अशी माहिती डॉक्टर विनिता शिंदे यांनी दिली.