गुन्हेगांरांनो खबरदार तुम्ही सीसीटीव्ही च्या नजरेत आहात
नांद ग्रामपंचायतीने ने घेतला पुढाकार
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
नांद :- नांद भीवापुर तालुक्यातील सर्वात मोठे गाव जवळपास दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात पोलिस चौकी असली तरी या चौकीच्या अंतर्गत १६ जंगव्याप्त गावे येतात या चौकीत पोलीस सहायक उपनीरीक्षक सह तीन सहायक पोलिस तैनातीवर असुन देखील गावात नित्यनेमाने भामटे चोर चोरी करून पोलीसांना आव्हान देत आहेत.
अशातच मागील १७ आगष्ट २०२३ रोजी ग्रामपंचायत घ्या स्वास्कॄतीक परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राहूल झालटे यांनी ग्रामपंचायत च्या वतीने सीसीटीव्ही १५ व्या वित्त आयोगातुन गावाच्या सभोवताल सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे यासाठी पुढाकार घेतला होता याचे औचित्य साधून नांद ग्रामपंचायत ने पुढाकार घेतला व नांद गावाच्या मुख्य चौकात व बाहेरून येणारे सर्व रस्त्यांवर एकंदर १६ सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केले.यावर आता सीसीटीव्ही कॅमेरे नजर ३६० एंगलने नजर फिरवली जाईल..
आजवर या भिवापूर ठाण्याचे अंतर्गत येना-या पोलीस चौकीत मागील एका महीन्यात एकंदर चार मोठ्या चोरी झाल्यात यात डडमल यांची बाईक,झाडे यांची पलटी प्लाऊ, धामणगाव रोडवरील प्रोकल्यांड मशीनच्या बॅटरी व डिझेल, शेतातील जनावरे पडवन्यासाठी लावलेले झटका मशीन अशासारख्या वस्तू चोरीला गेल्यात पण महीना लोटुन गेला पण भिवापूर ठाण्यात या घटनेची नोंद असताना या कोणत्याही चोरीचा अजुनही सुगावा लागला नाही.व कोणताही नांद चौकीत तैनात असलेला पोलीस कर्मचारी याचे औचित्य दाखवत नाही .अशातच नांद ग्रामपंचायत ने या गुन्ह्यांवर अंकुश लावत तातळीने ठराव पारीत करत गावात व गावाचे सभोवताल १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
आता गावात होणा-या हालचाली व रात्रीच्या अंधारात होणारी गुन्हेगारी यावर ग्रामपंचायत च्या माध्यमातून तीसरा डोळा नजर ठेवून राहणार आहे असे व्यक्यव्य नांद गट ग्रामपंचायत च्या वीध्यमान सरपंच शितल राजुरकर यांनी गावात होणा-या चो-या व पोलीसांना न गवसलेल्या आरोपी विरूद्ध सूर काढत आता सीसीटीव्ही घ्या माध्यमातून तीसरा डोळा यावर मदत करेल अशी अपेक्षा केली आहे
याकडे या गावात या महिन्यात झालेल्या या चोरीट्यांना पकडून त्यांनां त्याची कोठडी दाखवावी असे आव्हान ठाण्याचे सहायक पोलिस ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांना दिले आहेत.यावेळी उपसरपंच मोहन धारणे,रवि धाडसे, आशीष शिवरकर, सदानंद हिवरे,जोती बांगरी व ईतर सदस्य राजु बंडे, शंकर बावणे, सोनु बावणे, वैशवी चाचेरकर, कौसल्या वाकडे,रामा थेटे उपस्थित होते.
@ शितल राजुरकर सरपंच
गट ग्रामपंचायत नांद
पोलिस चौकित असतात पण गावात होणा-या हालचाली व कोणाचेही नियंत्रण नाही यामुळे यांचे तैनातीवर गावकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत कारण कोणीही गस्तीवर नसतात फक्त चौकीत वामकुक्षी घेत घराकडे परततात असे चित्र नांद चौकी चे आहे.यामुळे आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले पण गुन्हेगारी यावर अंकुश लावणारा पोलीस कर्मचारी याकडे लक्ष देणार आहेत काय..?