सरदार पटेल महाविद्यालयात शिक्षक- पालक सभा आयोजित
• विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि सुरक्षेसाठी महाविद्यालय कटिबद्ध- प्राचार्य डॉ.पी.एम. काटकर
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 4 ऑक्टोंबर
सरदार पटेल महाविद्यालयात शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर होते. शिक्षक, विदयार्थी आणि पालक यामध्ये सुसंवाद साधण्याच्या हेतूने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी केले. सभेत पालकांनी महाविद्यालयात अपेक्षित असलेल्या सोई सुविधा आणि पाल्यांच्या प्रगती बाबत आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षक-पालक संवादावर भर दिला व महाविद्यालयाच्या प्रगतीबाबत आणि विदयार्थी केंद्रित उपक्रमांबद्दल माहिती दिली. या प्रसंगी सत्र २०२४-२५ करिता शिक्षक-पालक समितीचे गठन करण्यात आले. यात प्राचार्य काटकर यांची पदसिद्ध अध्यक्ष, धर्मराव पेंदोर उपाध्यक्ष, विकास जयपुरकर सचिव, डॉ. वैशाली थूल शिक्षक सचिव, तर सीमा जोशी यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली. समितीचे सदस्य म्हणून संतोषी कादलवार, माधुरी अतकुलवार, वेंकटेश वैद्य, शरद काकडे, भारती राघाटाते, मिश्रा यांची निवड करण्यात आली. कार्याक्रमची सुरुवात, विद्यार्थांच्या स्वागतपर नृत्याने झाली. सभेचे संचालन डॉ. शरयू पोतनुरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सभेच्या समन्वयक डॉ. वैशाली थूल यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. वर्षा ठाकरे, डॉ. अजय बेले, डॉ. शरयू पोतणुरवार, डॉ. संजय उराडे, प्रा.अमोल कुटेमाटे, प्रा.भारती दीखीत, प्रा.शितल बोरा, प्रा.सुमिता चीटमलवार, प्रा.योगिता खोब्रागडे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी दशरथ कामतवार, अमर वेरुळकर यांनी सहकार्य केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.