सर्वोदय महाविद्यालय येथे”स्वच्छता ही सेवा” उपक्रमांतर्गत चित्रकलां स्पर्धेचे आयोजन

सर्वोदय महाविद्यालय येथे”स्वच्छता ही सेवा” उपक्रमांतर्गत चित्रकलां स्पर्धेचे आयोजन

सर्वोदय महाविद्यालय येथे"स्वच्छता ही सेवा" उपक्रमांतर्गत चित्रकलां स्पर्धेचे आयोजन

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही :- सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे स्वच्छ भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी “स्वच्छता ही सेवा” (SHS) जनआंदोलनाच्या अंतर्गत चित्रकलां स्पर्धा आयोजित करण्यात आली. १७ सप्टेंबर २०२४ ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता” या विचारावर देशभरात “स्वच्छता ही सेवा अभियान २०२४” साजरे केले जात आहे. या अभियानाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी भूषविले. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी डॉ. रिजवान सर आणि प्रा अमित उके सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

चित्रकला स्पर्धेत श्रेया सदनपवार यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर निकिता गुरु यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत दीपा राय, समीक्षा आत्राम, देविका अस्तकार, श्रेया सजनपवार, निकिता गुरु, पूर्वाई गायकवाड, हर्षा मेंडुळकर, अंकिता झोडे,साक्षी गुरनुले, प्रांजली बारेकर, सायली सावसाकडे,तनुश्री बावणखडे,प्रीती कोलते इत्यादी विद्यार्थिनी सहभाग नोंदवला, विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या महत्त्वावर प्रभावीपणे आपले विचार चित्राद्वारे मांडले, ज्यामुळे स्पर्धा अधिक प्रेरणादायी ठरली. परीक्षकाचे काम डॉ सिध्दार्थ मदारे, अनू लांजेवार व सायली पालकर यांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचारांची प्रशंसा केली आणि सामाजिक कार्यात अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी, अध्यक्ष डॉ राजेश डहारे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. “स्वच्छता ही सेवा” अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.या प्रसंगी प्राध्यापक चेतना अगडे, सूनील गभने, साहेबराव आडे यांनी मदत केली.