सरदार पटेल महाविद्यालयात १० ऑक्टोबरला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

सरदार पटेल महाविद्यालयात १० ऑक्टोबरला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

सरदार पटेल महाविद्यालयात १० ऑक्टोबरला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

सरदार पटेल महाविद्यालयात १० ऑक्टोबरला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 10 ऑक्टोंबर
येथील सरदार पटेल महाविद्यालयात चौथा व पाचवा पदवी वितरण सोहळा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उद्या गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.

हा कार्यक्रम महाविद्यालयातील स्व. शांताराम पोटदुखे सभागृहात होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार- पोरेड्डीवार हे राहणार आहेत, तर यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. जयेश चक्रवर्ती, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्याम धोपटे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यानंतर महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ घेण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत हा सोहळा होत आहे.
दरम्यान सरदार पटेल महाविद्यालयाने मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यापीठस्तरीय गुणवत्ता यादीत झळकण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या घोषित करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीत सरदार पटेल महाविद्यालयाचे ५४ विद्यार्थी यंदाच्या सत्रात गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यात पाच विद्यार्थी हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. त्याचबरोबर मागील सत्रात ५९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले होते. त्यात आठ विद्यार्थी हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले होते हे विशेष. या सर्वांचा या सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी गुणवंत विद्यार्थी, पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वोदय शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी केले आहे.