सर्वोदय महिला मंडळाच्या वतीने मातृसन्मान दिन साजरा

सर्वोदय महिला मंडळाच्या वतीने मातृसन्मान दिन साजरा

सर्वोदय महिला मंडळाच्या वतीने मातृसन्मान दिन साजरा

सर्वोदय महिला मंडळाच्या वतीने मातृसन्मान दिन साजरा

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 10 ऑक्टोंबर
सर्वोदय महिला मंडळाच्या प्रेरणास्त्रोत माजी राज्यमंत्री, दलित मित्र साहित्य रत्न यशोधारादेवी बजाज यांचा जन्म दिवस ९ ऑक्टोंबर रोजी सर्वोदय महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी मातृसन्मान दिन म्हणून साजरा केला जातो. मातृसन्मान दिनाच्या निमित्याने ९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या प्रांगणात असलेल्या यशोधरा बजाज यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आला. सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्षा निलमणी बजाज यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सर्वोदय महिला मंडळाच्या सचिव ममता बजाज, संस्थेचे कार्यपालन अधिकारी भरत बजाज यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले सिस्टर सुष्मा सिंघ, ब्रदर जे. बी. सिंघ, ब्रदर अमर सिंघ राठोड तसेच बजाज तंत्रनिकेतनचे प्राचार्य विजय कोयाळ, कमलादेवी बी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य वाकडे, नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पळवेकर व सर्वोदय महिला मंडळाच्या इतर संस्थेचे कर्मचारी व प्रतिनिधी तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन बजाज तंत्रनिकेतनचे प्रा. पि. आर. मालखेडे यांनी केले.