घोडपेठ येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारणार

घोडपेठ येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारणार

घोडपेठ येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारणार

घोडपेठ येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारणार

• दिनेश चोखारे यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन

चंद्रपूर : 10 ऑक्टोंबर
नागपूर मुख्य मार्गावर स्थित घोडपेठ येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुतळा उभारण्याची घोषणा नागरिकांनी केल्यानंतर दिनेश चोखारे यांनी घोषणेला उत्तर देत आपण सर्वतोपरी मदत करू लवकरच पुतळ्याचे काम पूर्ण करू असे आश्वासन दिले.

घोडपेठ येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे, धनकर महासंघाचे अध्यक्ष रमेश उरकुडे, ग्रामपंचायत उपसरपंच प्रदीप देवगडे, गटनेते ईश्वर निखाडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती मोरे, ज्ञानेश्वर घोरपडे, घोडपेठचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू शेरकी, अनिल घोटकर उपस्थित होते.