व्ही जी पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन खिडकी आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अलिबाग चा सन्मिल गुरव ठरला विजेता

व्ही जी पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन खिडकी आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अलिबाग चा सन्मिल गुरव ठरला विजेता

व्ही जी पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन खिडकी आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अलिबाग चा सन्मिल गुरव ठरला विजेता

व्ही जी पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन खिडकी आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अलिबाग चा सन्मिल गुरव ठरला विजेता
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: व्ही जी पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन, खिडकी आयोजित आणि रायगड बुद्धिबळ संघटना व रोटरी क्लब पाताळगंगा यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी खिडकी – अलिबाग येथे व्ही जी पाटील फाऊंडेशन चे विश्वस्त, रोजगार व स्वयंरोजगार विभाग कॉग्रेस चे रायगड जिल्हा अध्यक्ष आल्हाद पाटील आणि वैभव पाटील यानी त्यांचें वडील सामाजिक कार्यकर्ते ,तिनवीरा हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक, शिक्षणप्रेमी व समाजप्रिय व्यक्तीमत्व स्व वासुदेव गणेश पाटील यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून केले होते.*
यावेळी आल्हाद पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व शाल देऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले.

*ह्या स्पर्धेचे हे सलग ५ वे वर्षे होते. सलग पाच वर्षे खिडकी सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारच्या स्पर्धांचे सातत्याने यशस्वी आयोजन करणे आणि ग्रामीण भागातील युवकांना ह्या खेळासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देत प्रोत्साहन देणे हे फार कौतुकास्पद आहे. या बद्दल आयोजक आल्हाद पाटील आणि वैभव पाटील या दोन्ही बंधुंचे प सांगळे साहेब सहाय्यक निरीक्षक पोयनाड पोलिस स्टेशन आणि मान्यवरानी विशेष कौतुक केले.* यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात हर्षल पाटील – सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, चारू मगर -चिटणीस, अमित नाईक – अध्यक्ष अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ, जयेंद्र भगत – तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, डॉ संदेश पाटील – बागायतदार व शेती तज्ञ, ॲड रत्नाकर पाटील -पत्रकार ,ॲड प्रफुल्ल पाटील अध्यक्ष – शहापूर विभाग कॉग्रेस, निशीकांत मोकल, मच्छिंद्र पाटील – सरपंच रेवस, शाम घरत, दशरथ पाटील, जगदीश पाटील, हेमंत पाटील, प्रसन्न पाटील, रमेश पाटील, क्रांती कुमार पाटील, दत्तात्रेय पाटील, हितेंद्र पाटील, अजित पाटील, अनिल पाटील, दिलीप पाटील, संदेश पाटील किरण पाटील, मोहन पाटील, नितीन पाटील, मंगेश पाटील, धिरज पाटील, हनुमान पाटील, दत्ताराम पाटील, मनोज पाटील, संतोष पाटील, प्रसाद पाटील, संकेत पाटील, नंदकुमार पाटील, मनोज पाटील, खिडकी ग्रामपंचायत उपसरपंच सौ उज्वला पाटील, सदस्य राजेन्द्र पाटील, सदस्या सौ नंदाताई पाटील, सौ अंकीता पाटील, सुचिता पाटील , सुषमा पाटील इत्यादी अनेक मान्यवर तसेच स्पर्धक आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण १०८ स्पर्धक सहभागी झाले होते, त्यापैकी २४ जणांना विविध ट्रॉफी, रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आली तर किर्ती म्हात्रे या चार वर्षांच्या मुलीचे खास कौतुक करून अमित नाईक यांनी १०००रुपये आणि प्रसन्न कुमार पाटील यांनी ५०० रूपये बक्षीस देऊन तिचे कौतुक केले. स्पर्धेसाठी टूर्नामेंट डायरेक्टर विलास म्हात्रे , प्रमुख पंच चंद्रशेखर पाटील तसेच सहायक पंच सुशील गुरव ,तुषार देशपांडे ,अरुण पाटील तर संगणक पंच-श्रेयस पाटील यानी काम पहिले . सर्व लढती अत्यंत चुरशीच्या होउन अंतिम निकाल खालीलप्रमाणे*
*२५ वर्षाखालील गट*
सन्मील गुरव अलीबाग प्रथम,भावेश ठाकुर पेण द्वितीय,श्रावणी पाटील उरण तृतीय,आविष्कार मरभल अलीबाग चतुर्थ, ध्रुव घरत पेण पाचवा

*१७ वर्षाखालील गटात
अथर्व वाघ अलीबाग प्रथम,गौतम पवार गोरेगाव द्वितीय,सुयश वाठोरे माणगाव तृतीय,
लशिफा शेख गोरेगाव चतुर्थ,वेदान्त मेहता गोरेगाव पाचवा
१३ वर्षाखालील गटात
वरद गायकवाड , पेण प्रथम,आयांश टेंबे, माणगाव द्वितीय,युग फड अलीबाग तृतीय,कौस्तुभ भगत पनवेल चतुर्थ,भार्गवी नायडू गोरेगाव पाचवा,
ओमकार अंधेरे,
शुभम नांदगावकर,
कौस्तुभ वाघे ,काशीफ म्हालूंकर,
अपेक्षा मरभल,
आदर्श नराले,
हिमांशु पाटील ,
पूर्वी टेंभे ,
पारस एकाडे.
आणि किर्ति म्हात्रे वय वर्ष चार या सर्वाँना उतेजनार्थ म्हणून गौरविण्यात आले.