बिबट्याचा घरात घुसून महिलेवर हल्ला

134
बिबट्याचा घरात घुसून महिलेवर हल्ला

बिबट्याचा घरात घुसून महिलेवर हल्ला

बिबट्याचा घरात घुसून महिलेवर हल्ला

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

मूल : 11 ऑक्टोबर
बिबट्याने घरात घुसून झोपलेल्या महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवार, 11 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास तालुक्यातील शिवापूर चक येथे घडली. वंदना परशुराम निमगडे (46) असे जखमी महिलेचे नाव आहे.
शिवापूर चक हे गाव ताडोबा बफर झोनमध्ये येत असून, या भागात वाघ, अस्वल आदी वनप्राण्यांचा वावर आहे. हे गाव जंगलालगत असल्यामुळे येथील गावकरी नेहमीच दहशतीच्या वातावरणात जगतात. शुक्रवारी परशुराम निमगडे कुटुंबीय झोपले असताना पहाटे 4 वाजताच्या सुमारास बिबट्याने घरात घुसून वंदना निमगडे या महिलेवर हल्ला केला. घराजवळ कुत्र्यांचा आरडाओरड सुरू झाल्यामुळे परशुराम व कुटूंबीय झोपेतून जागे झाले. तेव्हा त्यांना पत्नी वंदना हिच्यावर बिबट्या हल्ला करीत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड करताच बिबट्या पळून गेला. घटनेची माहिती त्यांनी मूल वनविभागागला दिली असता वनाधिकार्‍यांनी घरी येवून घटनेचा पंचनामा केला व जखमी महिलेला उपचारासाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. घटनेचा पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी राहूल कारेकर करीत आहेत. गावकरी दहशतीत असून, वाघ व बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.