तर जे एस डब्ल्यू विरोधात कोर्टात दाद मागणार
शेकाप नेते पंडित पाटील यांचा इशारा
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: जे एस डब्लू कंपनी डोलवी पेण सर्व प्रकारचे प्रदूषण करीत असून वारंवार बैठकीत समज देवून देखील जिल्हा प्रशासाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम केले जात आहे. यापुढे देखील जर जे एस डब्लू कंपनी ऐकणार नसेल तर आम्हाला कंपनीच्या आडमुठ्या धोरणाविरोधात न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे.
जे एस डब्लू कंपनी डोलवी च्या विरोधात पंडित पाटील यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत निवेदन दिले.
पंडित पाटील यांनी म्हटले आहे की, जे एस डब्लू कंपनीचे दुषित सांडपाणी खाडीत सोडले जाते अशी तक्रार ग्रामस्थांनी फोटोसहीत अनेकदा केली आहे तसेच या कंपनी मधून मोठ्या प्रमाणावर दुषित वायू व धूळ सोडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे त्याच प्रमाणे धरमतर खाडी मध्ये खोदकाम करण्यात येत असल्याने भविष्यात बांध बंधीस्ती तुटण्याचा धोकाही नाकारता येत नाही कंपनीमुळे जल, वायू व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते.
कंपनी प्रशासनाकडून स्थानिक तरुणांना नोकरी मधून डावलले जाते, कंपनीच्या अवजड वाहतुकीमुळे रस्ते खराब होतात प्रवास करातांना अनेक अडचणी येतात, कंपनी प्रशासनाकडून सी, एस. आर. निधी वापरताना वाटाण्याच्या अक्षदा दाखवल्या जातात सांबरी ता. अलिबाग येथील बंधारा त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई चा प्रश्न, कंपनीची लेबर कॉलनी नसल्यामुळे आजूबाजूच्या ग्रामपंचायत यांवर आलेला तान आश्या अनेक समस्या संदर्भात आपल्या दालनात वेळो वेळी बैठकीचे आयोजन केले असता कंपनी प्रशासनाकडून फक्त गोड बोलून वेळ मारून नेली जाते, आज पर्यंत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचना व आदेशाला कंपनीने सतत केराची टोपली दखवीलेली आहे. आश्या मुजोर कंपनीचे अधिकारी आपल्या सूचना व आदेश मानत नसतील तर शे.का.प. अशा मुजोर अधिका-यांना धडा शिकविण्यासाठी समर्थ आहे परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असे आम्हाला वाटते.
या संदर्भात आपल्या स्तरावर माझ्यासह पेण व अलिबाग तालुक्यातील शेतकरी, उपविभागीय अधिकारी, खारभूमी अधिकारी व कंपनीच्या जबाबदार व निर्णयक्षम अधिकारी यांना मागील पाच वर्षात कंपनीने CSR फंडातून केलेल्या कामांची माहिती व किती स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला त्याची यादी सह बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे.