Gr. W. Celebrate the 72nd Republic Day at Linga.
Gr. W. Celebrate the 72nd Republic Day at Linga.

ग्रा. प. लिंगा येथे 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

युवराज मेश्राम प्रतिनिधी

कळमेश्वर:- ग्रा प लिंगा येथे सरपंच सौ पल्लवी प्रमोद हत्त्ती हस्ते ध्वजारोपण करण्यात आले तर गोसावी हाय स्कूल लिंगा येथे सामाजिक कार्यकर्ता प्रमोद हत्ती याच्या वतिने अत्यंत साध्या पाध्यतिने ध्वजारोपण करण्यत आले कार्यक्रमाला उपसरपंच दीपक पाल व सर्व सध्यशगन मुख्याध्यापक गिरी सर,रत्नपारखी सर, धवले सर, चौरे सर पोटपिते सर, धोटेसर जिल्हापरिषद शालेचे मुख्याध्यापक श्री मनब्बेकर सर बेलसरे सर, डा गोरे सर व गावकरी उपस्थित होते

देशभरात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला . 26 जानेवारी 1950 रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असं मानलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारलं.

स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम तब्बल 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस सुरु होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीनं राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत करण्यात आलं. याच दिवशी लोकशाही पर्वाची खऱ्या अर्थानं सुरुवात देशात झाली. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं. म्हणून याच दिवशी प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here