सहाण येथे आ. महेंद्र दळवींचे कार्यकर्त्याचा उत्साह व जल्लोषाने शक्तीप्रदर्शन
सर्वागिण विकास करण्याचा निश्चित प्रयत्न केला-आ. महेंद्र दळवी
अलिबाग (रत्नाकर पाटील)
आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर अलिबाग नजीक सहाण बायपास येथे युवा संवाद कार्यक्रमाचे निमित्ताने आमदार महेंद्र दळवींनी कार्यकर्त्याच्या उत्साह व जल्लोषाने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार काळ खंडात अलिबाग विधानसभा मतदार संघात सर्वागिण विकास करण्याचा निश्चित प्रयत्न केला असे उद्गार काढले.
विरोधकांच्या पाठोपाठ युवा संवाद सभेेच आयोजन करून आमदार महेंद्र दळवी यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उत्साह व जल्लोष यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा निर्धार त्यांनी दिला. शिवसेना युवासेना अलिबाग-मुरूड यांचे वतीने अलिबाग तालुक्यातील सहाण बायपास येथील मंगळ कार्यालयाच्या सभागृहात युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे ठिकाणी आमदार महेंद्र दळवी यांचे उत्साहात व जल्लोषात स्वागत झाले, ढोल ताश्याचा गजर, व बेंजोपथकाच्या तालावर कार्यकर्त्यानी, विशेषतः महिला कार्यकर्त्यानी ठेका धरला, व वाजतगाजत तसेच नाचत आमदार महेंद्र दळवी,जि.प.माजी सदस्या मानसीताई दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी,तालुका अध्यक्ष अनंता गोंधळी आदी मान्यवर मंडळीची मिरवणूक काढली.
प्रारंभी आमदार महेंद्र दळवी व शिवसेना पदाधिकारी यांचे हस्ते प्रतिमा पुजन, दिपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपिठावर विराजमान झाल्यावर आर्या अमित वाकडे या छोटया मुंलीनी केलेल्या शिवगर्जनेने कार्यक्रमास उत्साह व जल्लोष निर्माण झाला. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांच्या स्वागत व सत्कार अलिबाग-मुरूड शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनी केला, त्यानंतर आगरी समाज, मुरूड तालुका मुस्लिम महिला, आदीचे वतीने करण्यात आला.
यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधताना, गेल्या पाच वर्षातील आमदार काळातील आठवणीना उजाळा दिला, विकास कामांना चालना मिळन नसल्यानेच गुहावटीचा मार्ग पत्करल्याचा खुलासा त्यांनी केला. तर अडीच वर्षाच्या कालावधीत रेवस-करंजा पुलाची मागणी, त्यानंतर विकास कामांना मोठा निधी उपलब्ध केला. मुरूडचा कायापालट करताना 150 ते 200 कोटी रूपयांचा निधी दिला असल्याचे सुतोवाच केले. सर्वागिण विकासासह वैयक्तीक मदतीचा हात सुध्दा नेहमीच ठेवला असल्याचे सांगितले. भविष्यात चणेरा नजीक आरसीएफचा प्रकल्प तसेच खासदार सुनिल तटकरे यांचे समवेत अलिबाग या जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाणी आयटीसाठी विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले. एकूणच आमदार महेंद्र दळवी यांनी गेल्या पाच वर्षात अलिबाग व मुरूड विधानसभा मतदार संघात सर्वागिण विकासासाठी निश्चित प्रयत्न केला असल्याचे जाहीरपणे सांगितले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांचेवरील गिताचे शुभारंभ करण्यात आला. तसेच उपस्थितांशी संवाद साधून आमदार महेंद्र दळवी यांनी विविध युवा कार्यकर्त्यानी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिली.
एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघातून आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून या कार्यक्रमाचे माध्यमातून त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात व्यासपिठावर आमदार महेंद्र दळवी यांचेसह माजी जि.प.सदस्या मानसीताई दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, खजिनदार सुरेश म्हात्रे, दिपक रानवडे, आदिती दळवी, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख अनंता गाेंंधळी, आदी प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना युवासेना जिल्हा समन्वयक अजय गायकर, मुरूड युवासेना प्रमुख अमोल लाड, उपतालुका प्रमुख विकी वेगस, हर्षल घरत, संदेश थळे, अॅड महेश शिंदे, आणि युवासेना कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विक्रांत पाटील यांनी केले .सहाण येथे आ. महेंद्र दळवींचे कार्यकर्त्याचा उत्साह व जल्लोषाने शक्तीप्रदर्शन
सर्वागिण विकास करण्याचा निश्चित प्रयत्न केला-आ. महेंद्र दळवी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:
आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर अलिबाग नजीक सहाण बायपास येथे युवा संवाद कार्यक्रमाचे निमित्ताने आमदार महेंद्र दळवींनी कार्यकर्त्याच्या उत्साह व जल्लोषाने शक्तीप्रदर्शन केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार काळ खंडात अलिबाग विधानसभा मतदार संघात सर्वागिण विकास करण्याचा निश्चित प्रयत्न केला असे उद्गार काढले.
विरोधकांच्या पाठोपाठ युवा संवाद सभेेच आयोजन करून आमदार महेंद्र दळवी यांनी शक्तीप्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उत्साह व जल्लोष यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा निर्धार त्यांनी दिला. शिवसेना युवासेना अलिबाग-मुरूड यांचे वतीने अलिबाग तालुक्यातील सहाण बायपास येथील मंगळ कार्यालयाच्या सभागृहात युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे ठिकाणी आमदार महेंद्र दळवी यांचे उत्साहात व जल्लोषात स्वागत झाले, ढोल ताश्याचा गजर, व बेंजोपथकाच्या तालावर कार्यकर्त्यानी, विशेषतः महिला कार्यकर्त्यानी ठेका धरला, व वाजतगाजत तसेच नाचत आमदार महेंद्र दळवी,जि.प.माजी सदस्या मानसीताई दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी,तालुका अध्यक्ष अनंता गोंधळी आदी मान्यवर मंडळीची मिरवणूक काढली.
प्रारंभी आमदार महेंद्र दळवी व शिवसेना पदाधिकारी यांचे हस्ते प्रतिमा पुजन, दिपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपिठावर विराजमान झाल्यावर आर्या अमित वाकडे या छोटया मुंलीनी केलेल्या शिवगर्जनेने कार्यक्रमास उत्साह व जल्लोष निर्माण झाला. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांच्या स्वागत व सत्कार अलिबाग-मुरूड शिवसेना युवासेना पदाधिकारी यांनी केला, त्यानंतर आगरी समाज, मुरूड तालुका मुस्लिम महिला, आदीचे वतीने करण्यात आला.
यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थितांशी थेट संवाद साधताना, गेल्या पाच वर्षातील आमदार काळातील आठवणीना उजाळा दिला, विकास कामांना चालना मिळन नसल्यानेच गुहावटीचा मार्ग पत्करल्याचा खुलासा त्यांनी केला. तर अडीच वर्षाच्या कालावधीत रेवस-करंजा पुलाची मागणी, त्यानंतर विकास कामांना मोठा निधी उपलब्ध केला. मुरूडचा कायापालट करताना 150 ते 200 कोटी रूपयांचा निधी दिला असल्याचे सुतोवाच केले. सर्वागिण विकासासह वैयक्तीक मदतीचा हात सुध्दा नेहमीच ठेवला असल्याचे सांगितले. भविष्यात चणेरा नजीक आरसीएफचा प्रकल्प तसेच खासदार सुनिल तटकरे यांचे समवेत अलिबाग या जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाणी आयटीसाठी विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले. एकूणच आमदार महेंद्र दळवी यांनी गेल्या पाच वर्षात अलिबाग व मुरूड विधानसभा मतदार संघात सर्वागिण विकासासाठी निश्चित प्रयत्न केला असल्याचे जाहीरपणे सांगितले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांचेवरील गिताचे शुभारंभ करण्यात आला. तसेच उपस्थितांशी संवाद साधून आमदार महेंद्र दळवी यांनी विविध युवा कार्यकर्त्यानी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उत्तरे त्यांनी दिली.
एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदार संघातून आमदार महेंद्र दळवी यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून या कार्यक्रमाचे माध्यमातून त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. या कार्यक्रमात व्यासपिठावर आमदार महेंद्र दळवी यांचेसह माजी जि.प.सदस्या मानसीताई दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, खजिनदार सुरेश म्हात्रे, दिपक रानवडे, आदिती दळवी, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश चव्हाण, शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख अनंता गाेंंधळी, आदी प्रमुख कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना युवासेना जिल्हा समन्वयक अजय गायकर, मुरूड युवासेना प्रमुख अमोल लाड, उपतालुका प्रमुख विकी वेगस, हर्षल घरत, संदेश थळे, अॅड महेश शिंदे, आणि युवासेना कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विक्रांत पाटील यांनी केले .