अलिबाग येथील शितोळे आळी मित्र मंडळ तर्फे नवदुर्गांचा सन्मान
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:”जागर मरूआईचा, सोहळा नवरात्रीचा”. या अंतर्गत अलिबाग येथील शितोळे आळी मित्र मंडळ तर्फे अलिबाग मधील वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नवदुर्गांना सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ज्येष्ठ विधीज्ञ प्रवीण मधुकर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दसऱ्याच्या दिवशी “नवदुर्गा सन्मान २०२४” हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार प्राप्त नवदुर्गांना मान्यवरांच्या शुभहस्ते एक आकर्षक सन्मान चिन्ह तसेच भेटवस्तू प्रदान करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ॲड. प्रवीण मधुकर ठाकूर, ॲड. कविता प्रवीण ठाकूर, रवींद्र मधुकर ठाकूर, नमिता रवींद्र ठाकूर, शिवसेना उभारता युवा सेना जिल्हा प्रमुख अमीर मधुकर ठाकूर, ॲड. काजल अमीर ठाकूर, समीर मधुकर ठाकूर, दर्शना समीर ठाकूर, मिस टीन युनिव्हर्स २०१९ अपूर्वा प्रवीण ठाकूर निशा उमेश ठाकूर, अलिबाग नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, संतोष म्हात्रे, वृषाली ठोसर, अक्षया नाईक इ. मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी समाजात सामाजिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक व औद्योगिक क्षेत्रात उत्तुंग झेप घेणाऱ्या व इतरांना प्रेरणादायी ठरणाऱ्या स्त्री व्यक्तिमत्त्व डिझायनर लक्ष्मी मुकादम, कॅप्टन कृतज्ञा जनार्दन हाले, इम्प्ल्यूएन्सर अंकिता राऊत, ॲड.जिवीता पाटील, फूड इम्प्लीएन्सर नलिनी मुंबईकर, पोलीस सीमा सावंत, डॉ. राजश्री चंद्रकांत जगताप, वात्सल ट्रस्टच्या शोभा जोशी, समाज कार्यकर्त्या शकुंतला अशोक पाटील इ.ना “नवदुर्गा सन्मान २०२४” सन्मानपूर्वक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी ॲड. प्रवीण ठाकूर यांनी समाजात करीत असलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले तर आपण अशा समाजोपयोगी कार्यासाठी सदैव तत्पर असल्याचे मत त्यांनी या निमित्ताने व्यक्त केले. तर ॲड. कविता ताई ठाकूर यांनी नवदुर्गांचे कौतुक केले तसेच आपल्या कार्यामध्ये सर्व महिलांचे साथ ही खूप मोलाची ठरते म्हणूनच असे उपक्रम यशस्वीपणे पार पाडता येतात. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत असताना त्यांचे मन भरून आले. या प्रसंगी प्रत्येक सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.पेणच्या नेहा पाटील ढोलकीच्या तालावर फेम यांनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली, तर शितोळे आळी आणि मित्र मंडळ महिला यांनी सुंदर सामूहिक नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. विविध वेशभूषा करून छोट्या बालकलाकारांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळालेल्या. आपल्या ओघवत्या वाणीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रतिम सुतार तसेच पूजा यांनी निवेदन केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोरिओग्राफर जयेश पाटील व टीम तसेच अपूर्वा ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.