इकोफ्रेंडली गणपती सजावटीचे पारितोषिक वितरण
ऍक्टिव्हा,टीव्ही, रेफ्रिजरेटर,मिक्सर बक्षिसांचा अक्षरशः वर्षाव
दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांची अनोखी संकल्पना
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: गणपती उत्सवाच्या काळात अलिबाग,मुरुड,रोहा विभागात एक अनोखी स्पर्धा झाली समाजिक कार्यकर्ते म्हणून लोकप्रिय असलेल्या दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांची ही संकल्पना त्यांच्या सहकाऱ्यांनी अविरत मेहनत घेत प्रत्यक्षात राबविली रूप बदलत चाललेल्या उत्सवांना पुन्हा परंपरेची महिरप देण्यात आली यातून संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणण्याचे मोठे काम ह्या उत्सवाच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासूनच सुरू झालेले आहे.ही परंपरा ह्यावर्षीसुद्धा अबाधित राहिली.ही स्पर्धा म्हणजे इको फ्रेंडली गणपती सजावट स्पर्धा गावागावांतील प्रतिभावंत कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळाले या इको फ्रेंडली गणपती सजावट २०२४ स्पर्धेचा पारितोषिक सोहळा अलिबाग येथे होरायझन हॉलमध्ये गुरुवार,१७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता सोहळ्याला लोकांची मोठी गर्दी होती ऍक्टिव्हा,टीव्ही,रेफ्रिजरेटर,मिक्सर आदी बक्षिसांचा अक्षरशः वर्षाव होता. इकोफ्रेंडली गणपती सजावटीचे प्रथम क्रमांकाचे ऍक्टिव्हाचे पारितोषिक भारत घरत (दिवीपारंगी), द्वितीय क्रमांकाचे टी.व्ही. चे पारितोषिक श्री.सुनिल पाटील (परहूरपाडा)यांना तर तृतीय क्रमांकाचे रेफ्रिजरेटर हे पारितोषिक कु.पूजा कार्लेकर (मुरुड) व कु.वीर थळे (वाडगाव) यांना विभागून प्रदान करण्यात आले.२२ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. त्यांना प्रत्येकी मिक्सर भेट म्हणून देण्यात आले.स्पर्धेतील सर्वं सहभागी स्पर्धकांना गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.
यावेळी दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ यांच्यासह परशुराम म्हात्रे, ऍड.निखिल चव्हाण, संकेत ठाकूर, देवेन सोनावणे, , हरेश भोईर, संदेश पालकर, अमित ठाकूर, सुधीर चेरकर, पंकज अंजरा,ऍड. रत्नाकर पाटील, कु. भूषण साळवी, महेंद्र चौलकर, जनार्दन कंधारे, नरेश वारगे, कु.स्वप्निल चव्हाण, महेश ठाकूर, विरेश खेडेकर शैलेश नाईक, प्रथमेश मांजरेकर, रोहित भोईर, . रोहन नाईक, श्री.राकेश औचटकर, चेतन पाटील. नयन पाटील, मयूर गावंड, निखिल चव्हाण, सुरेश म्हात्रे, वैभव कांबळी उपस्थित होते.