जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न…..

82
जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न.....

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न…..

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ संपन्न.....

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या ३हजार ६८१ मतदान यंत्रांची पहिली जिल्हास्तरीय सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे , आचारसंहिता पथक प्रमुख उपजिल्हाधिकारी संदीपान सानप, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी निलेश लांडगे आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ६हजार २०० बॅलेट युनिट, ३ हजार ४०५ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ६८१ व्हीव्हीपॅट यंत्रांची पहिली सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. त्या-त्या विधानसभा मतदारसंघातदेखील मतदान केंद्रनिहाय मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया करण्यात येणार आहे, असे श्री. जावळे यांनी सांगितले.