श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक द्वारा उच्च श्रेणी मानांकन प्राप्त

72
श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक द्वारा उच्च श्रेणी मानांकन प्राप्त

श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक द्वारा उच्च श्रेणी मानांकन प्राप्त

श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक द्वारा उच्च श्रेणी मानांकन प्राप्त

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 21 ऑक्टोंबर
स्व. एम. डी. येरगुडे स्मृती शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित “श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय, भद्रावती” या महाविद्यालयास नॅकटीम च्या त्री – सदस्यीय समितीने, शासन निर्देशानुसार ८ व ९ ऑक्टोबर रोजी भेट देऊन महाविद्यालयाचे विस्तृत मूल्यांकन केले .
डॉ. सोमनाथ सचदेव , कुलगुरू , कुरुक्षेत्र विद्यापीठ यांच्या अध्यक्षीय नेतृत्वात डॉ. दिलीप शर्मा, डीन, डीएलए युनिव्हर्सिटी, मथुरा व डॉ. कृष्णामाचारी, प्रिन्सिपॉल, जे. बी.इन्स्टिट्यूट, हैद्राबाद या सदस्यांनी उत्तमरीत्या मूल्यांकनाचे काम केले.
नॅक कमिटी द्वारा प्राप्त मागील पाच वर्षापूर्वीच्या नॅक ग्रेडेशन मध्ये महाविद्यालयास उच्च मानांकन प्राप्त होण्याकरिता संस्थाध्यक्षा प्राध्या. विद्या. व्ही. येरगुडे, सचिव अमीत येरगुडे आणि उपाध्यक्ष अभिषेक येरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद गोरंटीवार तसेच अनुभवी, तज्ञ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाला उच्च श्रेणी मानांकन मिळवून देण्यासाठी परिश्रम घेउन मोलाचे सहकार्य केले.
सर्वांच्या प्रयत्नांतून आणि महाविद्यालयातील भौतिक सोयी सुविधा, सुसज्ज इमारत, भव्य नैसर्गिक – पर्यावरणपूरक परिसर तसेच एआयसीटीई च्या मानकानुसार डिजिटल क्लासरूम, डिजिटल लायब्ररी, सर्व यंत्रयुक्त वर्कशॉप, भव्य क्रीडांगण, इत्यादी अनेक बाबी ची उपलब्धता लक्षात घेऊन नॅक कमिटी चे महाविद्यालयाला बी+ मानांकन प्राप्त झाले आहे.
भद्रावती सारख्या मागास व अप्रगत भागात गरीब, होतकरू, मागासवर्गीय, आदिवासी तसेच तळागाळातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग – टेक्नॉलॉजी सारख्या आधुनिक तंत्रज्ञान शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊन स्व. डॉ. व्ही. एम. येरगुडे साहेब यांनी सन २००९ साली या महाविद्यालयाची स्थापना केली. येरगुडे साहेबांनी या महाविद्यालयाचे वटवृक्षात रूपांतर होण्याचे जे स्वप्न बघितले होते ते साकारण्यासाठी त्यांची प्रेरणा घेउन त्यांच्या पश्चात प्राध्या. विद्या येरगुडे मॅडम , त्यांचे दोन्ही पुत्र अमीत येरगुडे आणि अभिषेक येरगुडे यांनी संस्थेची धुरा खांद्यावर घेऊन संस्थेद्वारा संचालित सर्व शिक्षण संस्था व महाविद्यालयाची यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.
श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय भद्रावती या महाविद्यालयास बी+ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल संथेच्या वतीने नॅक कमिटी चे धन्यवाद मानून महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.