शेकापचं ठरलं विधानसभा निवडणूकीसाठी 6 उमेदवारांची नावे जाहिर

182
शेकापचं ठरलं विधानसभा निवडणूकीसाठी 6 उमेदवारांची नावे जाहिर

शेकापचं ठरलं
विधानसभा निवडणूकीसाठी 6 उमेदवारांची नावे जाहिर

शेकापचं ठरलं विधानसभा निवडणूकीसाठी 6 उमेदवारांची नावे जाहिर

अलिबागसह, पेण, पनवेल, उरण, सांगोला, कंधार मतदारसंघाचा समावेश

रत्नाकर पाटील रायगड ब्युरो चीफ 

अलिबाग :- अलिबाग विधानसभा मतदार संघातून अनेक आमदार निवडून गेले. त्यांनी विधानसभेसह संपुर्ण महाराष्ट्रात अलिबागची शान कायम टीकून ठेवली. त्यांनी जनतेची मान उंचावेल, असे कार्य केले आहे. सध्याच्या आमदारांनी कधी सभागृहात जनतेचे प्रश्न मांडले का, असा सवाल उपस्थित करीत त्या आमदाराला मतेदेखील मागण्याच अधिकार नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच आपली गेलेली आमदारकी या निवडणुकीत खेचून आणायची आहे. सुशिक्षीत व सर्व क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या उमेदवारांना आपण संधी दिली आहे. उद्याची निवडणूक प्रचंड मतांनी निवडून आणून 1957 सालची पुनरावृत्ती करायची आहे, असे शेकाप सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. तसेच अलिबाग-रोहा-मुरुड मतदारसंघात चित्रलेखा पाटील, पेणमध्ये अतुल म्हात्रे, पनवेलमध्ये माजी आ. बाळाराम पाटील, उरणमध्ये प्रीतम म्हात्रे, सांगोल्यात बाबासाहेब देशमुख व कंधारमध्ये श्यामसुंदर शिंदे या उमेदवारांची नावे जाहिर केली.
अलिबाग विधानसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकाप नेते जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.22) सायंकाळी भव्य सभा आयोजित करण्यात आली. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, माजी आ. बाळाराम पाटील, प्रा. एस.व्ही जाधव, राजेंद्र कोरडे, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदिप नाईक, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर, शेकाप राज्य विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा साम्या कोरडे, पेण विधानसभा मतदार संघातील उमेदवार अतूल म्हात्रे, उरणचे विधानसभा मतदार संघातील उमेदवार प्रीतम म्हात्रे, ॲड. नीलम हजारे, ॲड. अशिष रानडे, अशोक प्रधान, संजना कीर, वैशाली पाटील, सतिश प्रधान, द्वारकानाथ नाईक, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, नागेश कुलकर्णी, उरणच्या सीमा घरत, जिल्ह्यातील शेकाप चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, तालुका चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य,नगरपरिषद, जिल्हा परिषद ग्रामपंचायत व आदी विविध क्षेत्रातील आजी माजी पदाधिकारी, सभासद, शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील म्हणाले की, विधानसभेमध्ये अलिबागच्या आमदारांची एक वेगळी प्रतिमा होती. एक वेगळा दबदबा होता. परंतु टक्केवारी घेणाऱ्या आमदारांमुळे आपल्या अलिबागचे नाव बदनाम झाले आहे. त्यामुळे आपल्याला एक वेगळा बदल घडवून आणायाचा आहे. त्यामुळे ही निवडणूक एक वेगळ्या भुमिकेची असणार आहे. चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यात महिला संवाद मेळावे घेतले. या मेळाव्यातून कार्यकर्ते, महिलांना एक वेगळी उर्जा मिळाली आहे. सर्वांची उमेद, हिंम्मत वाढविण्याचे काम मेळाव्याने केले आहे. कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून चित्रलेखा पाटील यांच्या रुपाने आपला आमदार विधानसभेत पाठविण्यासाठी कामाला लागले पाहिजे. ही निवडणूकी शेतकरी कामगार पक्षाच्या अस्तित्वाची आहे. या निवडणुकीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणूकीत अमुलाग्र बदल करायचा आहे. सर्व शक्तीनिशी आपण उतरायचे आहे. पक्षाच्या जडणघडणीत जुन्या कार्यकर्त्यांचा वाटा मोलाचा राहिला आहे. त्यांनाही बरोबर घेऊन आपण काम करायचे आहे.
पुढे ते म्हणाले, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. विधिमंडळात प्रश्न मांडण्याची वैभवशाली आमदारकीची परंपरा ठेवली होती. पुन्हा वेगळ्या उमेदीने काम करून आपली आमदारकी खेचून आणायची आहे. त्यापध्दतीने कार्यकर्त्यांनी कामाला लागा. प्रचंड मतांनी आपले उमेदवार निवडून आले पाहिजे. या भूमिकेतून कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन आपले विचार मतदारांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे. शेकापचे चिन्ह आपले उमेदवार यांची माहिती घराघरात पोहचवून या निवडणूकीत भरघोस मतांनी आपल्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी कार्यर्त्यांनी सज्ज व्हावे. पुढील 25 वर्षे विरोधकांची आमदारकी घेण्याची हिम्मत होता कामा नये. चित्रलेखा पाटील या सुशिक्षीत असून सर्व क्षेत्रात त्यांचे काम कौतूकास्पद आहे. या निवडणूकीत वेगळी यंत्रणा उभी करून अमूलाग्र बदल करायचा आहे. ज्या पध्दतीने शेकाप गोरगरीबांसाठी लढला. त्यांना न्याय दिला. त्या पध्दतीने विचार घेत पुन्हा आपण वेगळ्या उमेदीने कामाला लागायचे आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

अलिबाग, पेण, पनवेल उरण मतदार संघातील उमेदवारी जाहीर
अलिबागमध्ये चित्रलेखा पाटील, पेणमध्ये अतूल म्हात्रे, उरणमध्ये प्रितम म्हात्रे यांच्याबरोबरच पनवेलमध्ये बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांनी सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी जाहीर केल्यावर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. गाण्यांच्या व बेंजोच्या ठेक्यावर अनेकांनी नृत्य करीत हा उत्सव साजरा केला.