शिवसेना ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा सहसमन्वयक पदी निलेश केसरकर यांची निवड.

72
शिवसेना ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा सहसमन्वयक पदी निलेश केसरकर यांची निवड.

शिवसेना ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा सहसमन्वयक पदी निलेश केसरकर यांची निवड.

शिवसेना ठाकरे पक्षाच्या महाड विधानसभा सहसमन्वयक पदी निलेश केसरकर यांची निवड.

✍️ नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞

माणगांव :- माणगाव तालुक्यातील पहेल या गावचे सुपुत्र युवा उद्योजक मा. निलेश केसरकर साहेब, महाड विधानसभा मतदार संघात दांडगा जनसंपर्क असणारे युवा उद्योजक निलेश रामदास केसरकर साहेब यांची सहसमन्वयक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
माननीय शिवसेना पक्ष प्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हा प्रमुख अनिल नवगणे साहेब यांनी मा .निलेश रामदास केसरकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाड विधानसभा मतदार संघ सहसमन्वयक पदी निवड केली.
मा.निलेश केसरकर यांनी आधीपासूनच स्वतःला सामाजिक क्षेत्रात झोकून दिले होते, एवडेच नाही तर त्यांनी काही सामाजिक संघटनांमध्ये सुध्दा अगदी मनापासून कार्य करून लोकांच्या मनामध्ये जागा मिळवली आहे,
गोरेगाव येथील ज्येष्ठ शिवसैनिक विजयराज खुळे यांच्या निवास स्थानी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महाड विधानसभा मतदार संघातील नेते हनुमंत तथा नानासाहेब जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देवून नियुक्ती करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ नेते विजयराज खुळे, उपजिल्हा प्रमुख पद्माकर मोरे, माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी अमित मोरे , लोणेरे विभाग प्रमुख प्रभाकर ढेपे, माणगाव उप तालुका प्रमुख मधुकर नाडकर, चंद्रकांत यादव, गोरेगाव विभाग प्रमुख शिवाजी गावडे, गोरेगाव गण संपर्क प्रमुख रोहित रातवडकर, मांजरोने विभाग संपर्क प्रमुख सचिन खिडबिडे, युवा सेना उप तालुका प्रमुख अक्षय कदम, राजा बिरवाडकर तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व शिवसैनिक बहु संख्येने उपस्थित होते