जनतेची अनमोल साथ..
मित्र पक्षांचा मदतीचा हात!
महायुतीच्या विजयाची हीच खरी सुरुवात!
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: होरायझन हॉल, अलिबाग येथे समन्वय समिती महायुती मेळावा पार पडला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा. ई आणि इतर घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. गेल्या अडीच वर्षात जनतेच्या हितासाठी केलेली कामे घेऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्धार सर्वांनी केला.
यावेळी, *आमदार महेंद्र शेठ दळवी* यांच्यासह आमदार अनिकेत तटकरे(राष्ट्रवादी), महेश मोहीते- जिल्हा सरचिटणीस निवडणूक समन्वयक, सतीश धारप- लोकसभा मतदार संघाचे प्रमुख, राजाभाई केणी – शिवसेना जिल्हा प्रमुख, दीपक रानवडे – जिल्हा संघटक (शिवसेना), मनोज भगत – (राष्ट्रवादी), गिरीश तुळपुळे – महाराष्ट्र प्रदेश सह सहयोग सहकार आघाडी, भाजपा, सुनिल सप्रे – तालुका अध्यक्ष, रि.पा.ई, हेमंत दांडेकर- भाजपा कोशाध्यक्ष रायगड जिल्हा, हर्षल पाटील – राष्ट्रवादी समन्वयक, उदय काठे- भाजपा अलिबाग ता.प्रमुख, शैलेश काते – भाजपा मुरुड तालुका प्रमुख, सतीश लेले – भाजपा जिल्हा चिटणीस, परशुराम म्हात्रे – भाजपा जिल्हा चिटणीस, पल्लवी तुळतुळे – भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, अमित नाईक- विधानसभा अध्यक्ष (राष्ट्रवादी), चारूहास मगर – जिल्हा सरचिटणीस, जयद्रे भगत – तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी), फैरोज घरटे- मुरुड तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी), नंदकुमार म्हात्रे – जिल्हा चिटणीस (राष्ट्रवादी), संतोष भाईर- ओबीसी सेल अध्यक्ष (राष्ट्रवादी), हरिश्चंद्र वाजेत्री – उपाध्यक्ष रोहा ता. (राष्ट्रवादी), रामचंद्र सकपाळ, – मा.सभापती रोहा, पंचायत समिती, आरतीमोकल – अलिबाग ता. महिला अध्यक्ष राष्ट्रवादी, मृणाल खोत- मुरुड ता. महिला अध्यक्ष (राष्ट्रवादी), कल्पना आयरे – भाजपा मुरुड तालुका महीला अध्यक्ष, मनोज कुमार शिंदे – रोहा तालुका प्रमुख, जीवन पाटील – अलिबाग संघटक, संतोष निगडे जी, मुन्ना कोटियान, शैलेश चव्हाण तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.