जिल्ह्यात आज सहा नामनिर्देशनपत्र दाखल

108
जिल्ह्यात आज सहा नामनिर्देशनपत्र दाखल

जिल्ह्यात आज सहा नामनिर्देशनपत्र दाखल

अलिबाग, महाड, पेण आणि उरण मतदारसंघात अर्ज दाखल

जिल्ह्यात आज सहा नामनिर्देशनपत्र दाखल

रत्नाकर पाटील रायगड ब्युरो चीफ ९४२०३२५९९३

अलिबाग: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि.22 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघा पैकी अलिबाग, महाड, पेण आणि उरण मतदारसंघात सहा उमेदवारांची नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

194-महाड विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 1 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्री.भरत मारुती गोगावले (शिवसेना).

192-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये आज 3 उमेदवारांची 3 नामनिर्देशन पत्र सादर झाली असून ती पुढील प्रमाणे. 1) श्रीमती चित्रलेखा नृपाल पाटील (शेतकरी कामगार पक्ष), 2) श्री.सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), 3) सुप्रिया जयंत पाटील (शेतकरी कामगार पक्ष).

191-पेण विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 1 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्री.रविंद्र दगडू पाटील, (भारतीय जनता पार्टी).

190-उरण विधानसभा मतदार संघामध्ये आज 1 उमेदवारांनी 1 नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे. श्री.कुंदन घरत (अपक्ष).

उमेदवारी अर्ज घेवून गेलेल्यांची मतदार संघ निहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे. 188-पनवेल 29 अर्ज, 189-कर्जत 5 अर्ज, 190-उरण 3 अर्ज, 192-अलिबाग 5, 194-महाड 5 अर्ज.