शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदार संघातील शेकापच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गुरुवारी (दि.24) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, ॲड. सचिन जोशी, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, युवा नेत्या अक्षया नाईक उपस्थित होत्या.