कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभ हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण.
याप्रसंगी बोलताना हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार Dr. Bharat Ratna at the hands of Karyasamrat MLA Sameerbhau Kunawar. Unveiling of the statue of Babasaheb Ambedkar
मुकेश चौधरी प्रतिनिधी
समुद्रपूर:- 26 जानेवारी या प्रजासत्ताक व संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी समुद्रपूर येथे पार पडला,या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे खासदार मा. रामदासजी तडस, हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार व भंते विमलकीर्ती गुणसारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना समीर कुणावार यांनी भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे व लिखित संविधान असून जगाच्या पाठीवर आजही हे भारतीय लोकशाही उपयोग असून लोकशाही अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा राजकीय क्षेत्रातील सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा असे विचार व्यक्त केले.भारतीय संविधान हे सर्व समावेशक संविधान असून जगातील सर्व राज्य घटनांचा अभ्यास करून आपल्या देशाला आवश्यक त्या बाबींचा समावेश या संविधानात असल्यामुळे सर्वांसाठी स्वीकार्य अशा पद्धतीचं हे संविधान असून त्यामध्ये लवचिकता आहे. या कार्यक्रमाला अतिथी म्हणून मा. श्री. विजयजी आगलावे समाजकल्याण सभापती जि. प. वर्धा, गजाननराव राऊत माजी नगराध्यक्ष, सौ. शीलाताई सोनारे माजी नगराध्यक्ष, सौ. वर्षाताई बाभुळकर माजी उपनगराध्यक्षा, व सर्व सन्माननीय माजी सभापती, नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायत समुद्रपूर चे सर्व पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार प्रतिष्ठान ते सर्व सदस्य, रमाबाई आंबेडकर महिला मंडळ समितीच्या सर्व सदस्य, सोबतच पं. स. सभापती सौ. पुष्पांजलीताई नेवल, श्री. चंद्रभानजी खंडाईत उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, श्री. अनिलजी जगताप मुख्याधिकारी हिंगणघाट, तसेच सर्व समुद्रपूर मधील व तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर व बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.