सलग सातव्या विजयासाठी मुनगंटीवार सज्ज
• सुधीर मुनगंटीवार सोमवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज
🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
बल्लारपूर : 25 ऑक्टोंबर
मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंझावात निर्माण करणारे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सोमवार, 28 ऑक्टोबरला हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर मुनगंटीवार 28 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता मूल येथील उपविभागीय कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. सलग सातव्या विजयासाठी सज्ज झालेले मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील तेव्हा महायुतीच्या घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केले आहे. यावेळी अर्ज भरण्यापूर्वी मुनगंटीवार मतदारसंघातील नागरिकांचा आशीर्वाद घेऊन मूल येथील बाजार चौक येथून उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज सादर करण्यासाठी निघणार आहे. मुनगंटीवार यांनी सलग सहा विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत.