महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांचा नामनिर्देशन अर्ज दाखल व शक्ती प्रदर्शन
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी,
९०१११९९३३३
कर्जत :-विधानसभेचे वारे सर्वत्र सुरू असतांना उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आज कर्जत येथील प्रशासकीय भवनामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नितीन नंदकुमार सावंत यांनी मोठा शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज भरून आल्यावर नितीन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली की, या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने व महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या प्रमुख उपस्तीतीत अधिकृत उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल केला आहे. या ठिकाणी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि एक दिवस उन्हातानात तीन साडेतीन तास मी बोललो अश्यात्या प्रमाणे अभूतपूर्व गर्दी करून नितीनदादा वर विश्वास दाखवला आहे. माझ्या सोबत कोण आहेत तर ही मायबाप जनता आहे व ती रस्त्यावर उतरली त्या सर्वांचे मी आभार मानतो. तुम्ही एक दिवस मला दिलाय अजून दहा दिवस माझ्यासाठी मला द्या. मला काम करायचंय गाववाडी वस्तीवर जायचंय त्यानंतर येणारी पाच वर्ष तुमची सावली म्हणून मी उभा राहीन. तुमच्या घराचा तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून प्रेम मला नेहमीच दिलेत ते आज पर्यंत तुम्ही दाखवून दिलेत. ते काम पाच वर्षे मी प्रामाणिकपणे करेल. तसेच रोजगाराचा प्रश्न असेल रुग्णालयाचा प्रश्न असेल तर प्रत्येक वेळी माझ्या मतदारसंघातील जनतेला मुंबई जावे लागते. आजही पाण्याचा प्रश्न कायम तसाच आहे. ग्रंथालय नाही त्यासाठी या मतदारसंघात काम करावं लागेल. त्या मतदारसंघात फक्त करायचं नाही तर भक्कम स्वरुपात काम करायला पाहिजे.
सावंत यांनी ही रॅली शिवालय कार्यालयातून सकाळी ११ च्या सुमारे यामध्ये अंदाजे सहा हजाराच्या वर कार्यकर्ते सहभागी होते. तर ढोल ताशे, डीजे आधीच्या तालावर कार्यकर्त्यांन सोबत सुरेश टोकरे, संजय गवळी तसेच कर्जत तालुक्याचे अध्यक्ष उत्तम कोळंबे खालापूर तालुक्या अध्यक्ष एकनाथ पिंगळे, महिला पदाधिकारी युवासैनिक आधी उपस्थित होते. दरम्यान आज होणाऱ्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला कोणताही गालबोट लागू नये या साठी कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी डी.डी. टेळे, यांच्यासह कर्जत माथेरान, खोपोली, खालापूर,येथील पोलीस अधिकारी, 75 कर्मचारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आज एकूण सात नाम दर्शक अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये २८ ऑक्टोबर नितीन नंदकुमार सावंत .. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, किरण खंडू ठाकरे.. भारतीय जनता पार्टी.. व अपक्ष, नमिता सुधाकर घारे.. अपक्ष, श्रीराम बळीराम महाडिक.. बसपा, सुधाकर यादवराव घारे.. अपक्ष या उमेदवारांचा समावेश आहे.