झेप फौंडेशन तर्फे ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
गिरड:- झेप फौंडेशन द्वारे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सत्कार सोहळ्यत सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील जेष्ठ नागरिकांनी हाजरी लावली. यावेळी अनेकांनी आपले विचार मांडत लोकांना संबोधित केले.
“हाक तुमची झेप आमची” गाव विकासासाठी कश्या प्रकारे काम करता येईल याबद्दल सुद्धा अनेक लोकांनी झेप फॉउंडेशन च्या माध्यमातून विचारं मांडले. यावेळी वसंतराव पर्बत, होमदेवराव गिरडे, शांताराम भुरे, अरुण मोटघरे, यादवरावजी गाठे, त्याच सोबत नुकतेच निवडून आलेले ग्रा. प. सदस्य शेख इस्राईल, राजू नौकरकर, अमोल पर्बत, मंगेश गिरडे, राहुल गाढवे, विजया तेलरांधे, इंदुबाई कापसे तसेच आधी सर्व सदस्य उपस्तित होते. या कार्यक्रमाचे आयोजन झेप फौंडेशनचे संस्थापक तुषार गिरडे, तसेच सदस्य संकेत डाखरे, शुभम वैद्य, प्रवीण तिमांडें, अतुल काळबांडे, अंतरिक्ष घेणगारे, आकाश निनावे, संकेत शेगोकर, अभिषेक उगे, राहुल गाठे, शुभम लांबट, भूषण गाठे आदी सदयसानी मेहनत घेत केले.