गोंधळपाडा रस्त्यावर पडला पैशाचा पाऊस अनेकांची झाली दिवाळी , पैसे राजकारण्यांचे की सामान्यांचे प्रश्न अनुत्तरीत

333
गोंधळपाडा रस्त्यावर पडला पैशाचा पाऊस अनेकांची झाली दिवाळी , पैसे राजकारण्यांचे की सामान्यांचे प्रश्न अनुत्तरीत

गोंधळपाडा रस्त्यावर पडला पैशाचा पाऊस
अनेकांची झाली दिवाळी , पैसे राजकारण्यांचे की सामान्यांचे प्रश्न अनुत्तरीत

गोंधळपाडा रस्त्यावर पडला पैशाचा पाऊस अनेकांची झाली दिवाळी , पैसे राजकारण्यांचे की सामान्यांचे प्रश्न अनुत्तरीत

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
9420325993
अलिबाग: अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा रस्त्यावर बुधवारी पैशाचा पाऊस पडला. या पैशांचा मालक कोण हे समजले नाही मात्र यावेळी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांची दिवाळी झाली. काही सेकंद, अवघ्या काही सेकंदात हजोरो रुपये घेऊन वाटसरू पसार झाले आहेत.बुधवारी
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. कर्जत येथील एक्साइज् कार्यालयाची महिला कर्मचारी या रस्त्यावरून जात असताना ही बाब त्यांच्या निदर्शास आली, त्यांना देखील अडीच हजार रुपये मिळाले. ही रक्कम या तरुणीने अलिबाग पोलीस स्टेशनच्या मार्शल बिटकडे सुपूर्द केले आहेत.
अलिबाग जवळील गोंधळपाडा रस्त्यावर दुपारी तुरळक रहदारी सुरू होती. अचानक या रस्त्यावर पाचशे रुपयांच्या नोटा पासलेल्या दिसल्या. प्रत्यक्षदर्शिंच्या म्हणण्यानुसार 500 रुपयांच्या नोटांची मोठी रक्कम होती. या नोटा पाहून यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्यानी या नोटा हातोहात लंपास केल्या.
दरम्यान. रस्त्यावर पडलेल्या या नोटा निवडणुकीसाठी वापरल्या जाणार होत्या की, कुठल्या सामान्य माणसाची वर्षाची कमाई होती याबाबत चर्चा सुरू झाली आहे. एखाद्याच्या पिशवीतून ही रक्कम पडली असावी, दिवाळीचा पगार किंवा कामगारांचा बोनस असू शकतो त्यामुळे ज्यांना कोणाला ही रक्कम मिळाली आहे त्यांनी अलिबाग पोलिसांकडे ही रक्कम सुपूर्द करून माणुसकी दाखवावी असेही म्हटले जात आहे.