दिलीप भोईर उर्फ छोटेमशेठ यांची भारतीय जनता पार्टी मधून सहा वर्षासाठी हकालपट्टी

96
दिलीप भोईर उर्फ छोटेमशेठ यांची भारतीय जनता पार्टी मधून सहा वर्षासाठी हकालपट्टी

दिलीप भोईर उर्फ छोटेमशेठ यांची भारतीय जनता पार्टी मधून सहा वर्षासाठी हकालपट्टी

दिलीप भोईर उर्फ छोटेमशेठ यांची भारतीय जनता पार्टी मधून सहा वर्षासाठी हकालपट्टी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अलिबाग विधानसभा मतदार संघाचे विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहणारे दिलीप उर्फ छोटम शेठ भोईर यांची यांनी युतीच्या उमेदवाराविरुद्ध विधानसभेसाठी निवडणूक अर्ज भरल्यामुळे त्यांची सहा वर्षासाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल पाटील यांनी जाहीर केली आहे.

दिलीप विठ्ठल भोईर उर्फ छोटेमशेठ यांनी शेतकरी कामगार पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना विधानसभा लढवण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीने दिलं होते.त्या बाबत अनेक वरिष्ठ नेत्यांनी सभेत जाहीर केले होते.त्या नुसार त्यांनी मतदासंघांत आपले कार्य सुरू केले होते.त्यानुसार त्यांनी प्रचंड गर्दीने अलिबाग विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु महाराष्ट्र मध्ये युतीचे सरकार असल्याने अलिबाग विधानसभा मतदारसंघाची जागा ही विद्यमान आमदार महेंद्र दळवी शिवसेना शिंदे गट यांना मिळाल्यामुळे दिलीप भोईर यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु दिलीप भोईर हे आपल्या मताची ठाम राहून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यक्ष धैर्यशिल पाटील यांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये दिलीप उर्फ छोटे भोईर यांची सहा वर्षासाठी पक्षातून हाकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे.तसेच दिलीप भोईर यांच्यासोबत पक्षातील इतर कार्यकर्ते, पदाधिकारी सोबत राहून त्यांना सहकार्य करून त्यांनी पक्षविरोधी कार्य केले तर त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
या वेळी भाजपा चे सतीश धारप, ॲड. महेश मोहिते,सतीश तुळपुळे,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.