निजामपूर येथे भव्य अदिवासी समाज मेळावा
आदिवासी समाजाचे ज्यांनी पैसे लुटले त्यांची चौकशी लावणार !
इथल्या भामट्यांना तासगांव भागाड एमआयडीसीची लुट करायची होती : आ. भरतशेठ गोगावले
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव:-महाड विधानसभा मतदार संघातील निजामपूर येथे आदिवासी समाजाचा भव्य मेळावा दि.९ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने आयोजित केला होता. यावेळी महाड पोलादपूर माणगांवचे कार्यसम्राट आमदार व आताचे उमेदवार भरतशेठ गोगावले यांनी बाबुशेठ खानविलकर यांचे नांव न घेता, ज्यांनी आदिवासी समाजाचे भाले, तासगाव गावाचे एमआयडीसीत गेलेल्या जागेचे पैसे लुटले त्यांची मी चौकशी लावणार असून अशा गोरगरीब लोकांची फसवणूक करणाऱ्यांना त्याची हाय लागल्याशिवाय राहणार नाही.गरीबांच्या जागेचा पैसा घेऊन यांनी दुसरीकडे जागेत गुंतवणूक केली आणि हा हरामाचा पैसा बुडाला अशी खरमरीत टीका केली.आज जे फिरत आहेत त्यांनी ना कुठल्या गावाचा विकास केला ना कोणाच्या सुख दुःखात सामील झाले ना कोणाच्या अडी अडचणीत धावून आले. त्यामुळे तुम्हाला घरात घेणारा आमदार हवा की बाहेरच्या बाहेर पाकटवणारा आमदार हवा ते ठरवा असे आवाहन केले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच राजाभाऊ रणपीसे,आदिवासी समाज तालुका अध्यक्ष नथुराम वाघमारे,अनंता महाडीक,महेंद्र मानकर,अरूण चाळके,सुधीर पवार,विपुल उभारे,रविंद्र जाधव, नितीन पवार, मंगेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.विरोधकांचा समाचार घेताना आ. गोगावले यांनी इथले जे काही भामटे आहेत त्यांना भागाड तासगांव मधील एमआयडीसीची लुट करायची होती ती आम्ही होऊ दिली नाही . कारण हे राहतात भाले येथे एमआयडीसी तासगाव भागाडची येथील परिसरातील लोकांच्या जागा गेल्या असून मलई यांना खायची आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही असा इशारा दिला.मी एकमेव असा आमदार आहे की ज्यांना ८५०० महिलांनी रक्षाबंधनाला राख्या बांधल्या त्यामध्ये ३५०० आदिवासी महिला होत्या.कोणताही समाज असो कोणी आजारी पडले, कोणताही प्रसंग आला तरी आमच्या कडून मदत होते. मी पंधरा वर्ष येत आहे.आता कोणीतरी येतील आणि भुलथापा मारतील त्याला बळी पडू नका.मला गोरगरीब जनतेचा आशीर्वाद मिळाला आहे माझा विजय निश्चित आहे.आता लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये होणार आहेत. पन्नास बौद्ध विहारांची कामे चालू असून निजामपूरमध्ये बौद्ध व आदिवासी समाजा करिता सामाजिक सभागृह लवकरच बांधून देण्यात येईल.
आपल सरकार कोणत्या जाती धर्म विरोधात नाही जोपर्यंत मी आहे तो पर्यंत कोणाच्या केसाला धक्का लागणार नाही असे मुस्लिम समाजाला सांगितले अशी ग्वाही गोगावले यांनी दिली.भोंगा आणि राज ठाकरे राज ठाकरेंनी सांगितलं भोंगे उतरवू, चार वर्षे त्यांचं हे वक्तव्य सुरु आहे पण आपले सरकार उतरवणार नाहीत. हे आपलं सरकार कोणत्याही जातीधर्माच्या विरोधात नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाने कोणताही विचार मनात न ठेवता महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.यावेळी आदिवासी समाज हा पूर्णपणे गोरगरिबांचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्याच पाठीशी ठामपणे राहणार असल्याची ग्वाही आदिवासी समाज तालुका अध्यक्ष नथुराम वाघमारे यांनी दिली. देशमुख ११ वेळा आमदार झाले, आमदार भरतशेठ गोगावले हे त्यापेक्षाही जास्त वेळा होतील असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तालुका अध्यक्ष रवी शेठ जाधव यांनी केले.युवासेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.दाखणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा शिंदे गटाचा दाखवून खोटा प्रचार केला. विरोधक दाखणे ग्रामपंचायतीत येऊन भरतशेठ ने वाट लावली असा प्रचार करतात मात्र भरतशेठने दाखणे गावाला विकासाची वाट दाखवल्याचा दावा प्रसंगी केला. निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी निजामपूर विभागातून आमदार भरतशेठ गोगावले यांना ५००० मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले.निवडणुका आल्यावर जनतेत फिरणाऱ्या विरोधकांना २० तारखेनंतर घरी बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही.सोन्याला चमचा तोंडात घेऊन आलेल्यांना तुम्ही मत दिलीत तर ती मते वाया जाणार आहेत असा सल्ला देखील मतदारांना दिला.