समर्थ इन्व्हेस्टमेंट्स आयोजित रांगोळी स्पर्धेत रंगले अवघे अलिबाग

132
समर्थ इन्व्हेस्टमेंट्स आयोजित रांगोळी स्पर्धेत रंगले अवघे अलिबाग

समर्थ इन्व्हेस्टमेंट्स आयोजित रांगोळी स्पर्धेत रंगले अवघे अलिबाग

समर्थ इन्व्हेस्टमेंट्स आयोजित रांगोळी स्पर्धेत रंगले अवघे अलिबाग
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: दिवाळी म्हटलं की साहजिकच मनात येतो तो दिवाळीचा चविष्ट फराळ, डोळ्यांना शीतलता देणारा आकाश कंदील, घराचा उंबरठा प्रकाशमान करणाऱ्या पणत्या आणि अर्थातच घरचं अंगण शुभांकित करणारी रांगोळी. अशा या दिवाळी सणाच्या अविभाज्य अंग असणाऱ्या रांगोळीला दीपावलीच्या निमित्ताने स्पर्धेचे स्वरूप देऊन अलिबाग मधील कलाकारांना हक्काचं अंगण दिलं ते समर्थ इन्वेस्टमेंट्स या अलिबागस्थित अर्थसंस्थेने.

देव दिवाळीच्या निमित्ताने समर्थ इन्वेस्टमेंट्स तर्फे अलिबागकरांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजिण्यात आली होती, ज्यात सुमारे 30 हून अधिक निष्णात कलाकारांनी सहभाग घेतला व एकाहून एक अप्रतिम रांगोळ्या काढून रसिकांना व परीक्षकांना मंत्रमुग्ध केले.

अवघ्या एक महिन्यापूर्वी अलिबागकरांच्या सेवेत रुजू झालेल्या समर्थ इन्व्हेस्टमेंट्स या अर्थसंस्थेने केवळ व्यावसायिक नातं अलिबागकरांशी जोडण्यावर भर न देता सांस्कृतिक नातंदेखील दृढ करावं या उद्देशातून या रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेलं होतं. ज्याप्रमाणे गुंतवणूकदाराच्या आर्थिक वृद्धीची जबाबदारी समर्थ इन्वेस्टमेंट्स स्वीकारते, ज्याप्रमाणे त्यांना योग्य सल्ला देऊन त्यांच्याकडील संचित धनाची सुयोग्य पद्धतीने गुंतवणूक केली जावी ह्याकडे ज्या पद्धतीने भर असतो त्याप्रमाणेच अलिबागकरांच्या कलाविश्वाला, सांस्कृतिक उपक्रमांना अधिक समृद्ध करता यावं ह्या उदात्त उद्देशातून रांगोळी स्पर्धे सारखे उपक्रम आयोजिण्याचा मानस असल्याचे ह्या निमित्ताने समर्थ इन्वेस्टमेंट्सच्या वृषाली व सचिन पाटील यांनी मुद्दाम सांगितले. त्यांचे भागीदार निलेश व गौरी जोशी तसेच प्रिया व अनिरुद्ध थेटे यांनी देखील या गोष्टीला दुजोरा दिला.

रांगोळी स्पर्धेमध्ये एकाहून एक अव्वल रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या. त्या रांगोळ्यांना पारितोषिके परीक्षकांमार्फत जाहीर करण्यात आली.

कुठल्याही नवीन शहरात आपण जर तिथल्या नागरिकांशी संबंध प्रस्थापित करत असू तर केवळ व्यवसायाभिमुख न राहता त्यांच्याशी सामाजिक दृढ नातं निर्माण करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे असं मत समर्थ इन्व्हेस्टमेंट्सचे प्रमुख मार्गदर्शक अभिजीत सरदेसाई यांनी यानिमित्ताने मुद्दाम व्यक्त केले.

परीक्षक म्हणून सौ.डॉक्टर राजश्री चांदोरकर, सौ. पूजा काठे, सौ.नीरजा जोशी, सुरेखा सरदेसाई या मान्यवरांनी जबाबदारी पार पाडली व स्पर्धेअंती रांगोळी क्रमांक एक व्यक्ती चित्र संदेश आमले, क्रमांक दोन निसर्ग चित्र यश पाटील, तृतीय क्रमांक संदेशपर चित्र नेहा पाटील, चतुर्थ क्रमांक संदेशात चित्र पूजा थोरात आणि पाचवा क्रमांक प्राजक्ता सातविडकर यांना विजयी घोषित करण्यात आले.तसेच ५ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या ह्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा अलिबागकरांनी मनापासून आनंद लुटला आणि समर्थ इन्व्हेस्टमेंट्सचे अशा पद्धतीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आभार व्यक्त केले व कौतुक देखील केले.