सर्व समाजाचा सर्वसमावेशक विकास आणि समान न्याय आमच्या विकासाची संकल्पना – आ. किशोर जोरगेवार
• हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्ला ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान जोरगेवार यांच्या प्रचारासाठी चंद्रपूरात
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 15 नोव्हेंबर
मागील पाच वर्षांत चंद्रपूरात विकास होत असताना या विकासकामांमध्ये सर्व समाजाला समान न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहिला. मुस्लिम समाजबांधवांचे माझ्यावर नेहमीच स्नेह राहिले आहे. जवळपास पाच कोटी रुपयांमधून आपण विविध मस्जिद, कब्रस्तान, इदगाह यांचा विकास केला आहे. पुढेही सर्व समाजाचा सर्वसमावेशक विकास आणि समान न्याय आमच्या विकासाची संकल्पना राहणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ नागपूर येथील हजरत बाबा ताजुद्दीन रहमतुल्ला ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान चंद्रपूरात आले होते. यावेळी विठ्ठल मंदिर वार्ड आणि बिनबा वार्ड येथे सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर, रमेश भुते, गणेश बनक, राशिद हुसेन, यश बांगडे, गणेश रामगुंडावार, मुग्धा खाडे, रवि चहारे, राहुल पाल, दीपक हुड, अनवर अली, सज्जाद अली, सय्यद चांद, अमीन शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज प्यारे खान माझ्या प्रचारासाठी चंद्रपूरात आले आहेत. आपले स्वागत आहे. आपण दाखविलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, हा शब्द देतो, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. बिनबा वार्डात आपण अनेक विकासकामे केली आहेत. कधीही जात-धर्म न पाहता आलेल्या कामाला महत्त्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपला राहिला आहे. आपण या पाच वर्षांच्या कार्यकाळात मदिना मस्जिद हॉल, बोहरा समाज कब्रस्तान, शाही गुप्त मस्जिद समाजभवन, शाही इदगाह सुरक्षा भिंत, पडोली मस्जिद हॉल, रयमत नगर येथे 70 लाख रुपयांतून मूलभूत सुविधा, खरतडी कब्रस्तान, किदवाई शाळा येथे शालेय साहित्य, ताडाली कब्रस्तान इत्यादींसाठी पाच कोटींहून अधिक रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाचे माझ्यावर नेहमीच प्रेम राहिले आहे. हे प्रेम आजच्या सभेतील आपल्या उल्लेखनीय उपस्थितीतून व्यक्त झाले आहे. आपली साथ कायम असू द्या, विकास थांबणार नाही, असे ते म्हणाले. विठ्ठल मंदिर वार्डातील सभेला संबोधित करताना आ. जोरगेवार म्हणाले की,
हा माझा परिसर आहे. येथील प्रत्येक व्यक्तीशी माझे व्यक्तिगत संबंध आहेत. या भागात आपण मोठा निधी दिला आहे. येथील पठाणपुरा व्यायामशाळा एक कोटी रुपयांतून तयार होणार आहे. पुढेही या भागाचा सर्वोत्तम विकास करण्याचा आपला संकल्प आहे.”
• आमदार किशोर जोरगेवार यांना विजयी करा- प्यारे खान
आमदार किशोर जोरगेवार यांची विकासकामे आज चंद्रपूरात दिसत आहेत. ते मनमिळावू आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळणारे नेतृत्व असून, समाजाच्या विकासासाठी सर्वधर्मसमभाव असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे,असे आवाहन प्यारे खान यांनी केले.