शिवशाही आणि मालवाहतूक ट्रक चा अपघात
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग पेण मार्गावर ट्रक आणि शिवशाही एसटी बसचा अपघात झाला. या अपघाता मध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही . ही घटना आज दुपारी सागाव जवळ घडली . अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. अलिबाग आगारातून दुपारी साडेबारा वाजन्याच्या सुमारास विना थांबा शिवशाही एसटी बस पनवेल कडे निघाली होती. दुपारी पाहुणे एक वाजण्याच्या सुमारास सागाव जवळ आल्यावर समोरून मालवाहतूक ट्रक या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक लागली. या धडके दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे सुदैवाने मोठी जीवित हानी टळली. एसटीतील प्रवासीना किरकोळ दुखापत वगळता सुखरूप असल्याची माहिती आगारातून देण्यात आली आहे. या अपघातामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.