आरसीएफ थळतर्फे मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९८३
अलिबाग:राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) थळतर्फे सरखेल कान्होजी आंग्रे वसाहतीमध्ये शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयोजित या उपक्रमात महा व्यवस्थापक मानव संपदा संजीव हरळीकर यांसह कर्मचारी व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून नागरिकांमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती उपक्रम स्वीप कार्यक्रमांतर्गत राबविण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. या अनुषंगाने कारखान्यातील कामगारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने १९२ अलिबाग विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी आरसीएफ व्यवस्थापनाला एका पत्राद्वारे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आरसीएफ थळ तर्फे सरखेल कान्होजी आंग्रे वसाहतीमध्ये शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात महा व्यवस्थापक मानव संपदा व प्रशासन संजीव हरळीकर, मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक (प्रभारी) महेश पाटील, वरिष्ठ मानव संपदा व्यवस्थापक प्रशांत म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक हितेश थळे(मानव संपदा विकास), वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी संतोष वझे यांसह कर्मचारी व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.