दहिवली कोंड येथे ठाकरे गटाला पुन्हा धक्का; उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

325
दहिवली कोंड येथे ठाकरे गटाला पुन्हा धक्का; उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश...

दहिवली कोंड येथे ठाकरे गटाला पुन्हा धक्का; उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

दहिवली कोंड येथे ठाकरे गटाला पुन्हा धक्का; उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश...

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :-विधानसभा निवडणणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाही पक्षप्रवेशाचा धडाका अजून सुरूच आहे. मला आनंद आहे आपल्या कामावर विश्वास ठेऊन कार्यकर्ते आपल्या पाठीशी उभे राहत आहेत. गेल्या काही दिवसांत विविध गावं, वाड्या, वस्त्यांमधील नागरिकांनी तसेच उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. निवडणूक तोंडावर असताना आता मतदारसंघातील दहिवली कोंड येथे उबाठाला आणखी एक धक्का लागला आहे.

गोरेगाव विभागातील दहिवली कोंड येथील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात दिपेश संदिप पालकर, मच्छिंद्र साबाजी पालकर, बाळाराम तुकाराम पालकर, रविंद्र रामचंद्र पालकर, सुदेश साबाजी पालकर, मारुती सिताराम पालकर, दत्ताराम हरी पालकर, रमेश विठोबा पालकर या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रवेश कर्त्यांचे भगव्या पताका घालून स्वागत केले. याप्रसंगी ॲड. महादेव मानकर, शाखाप्रमुख बळीराम बाबाजी पालकर, उपशाखा प्रमुख दिलीप सखाराम पालकर आदी मान्यवर, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.