गाडीतून काचा बंद करून फिरणाऱ्यांच्या काचा जनतेने बंद केल्या :आमदार गोगावले यांचा जगताप कुटुंबीयांवर निशाणा

219
गाडीतून काचा बंद करून फिरणाऱ्यांच्या काचा जनतेने बंद केल्या :आमदार गोगावले यांचा जगताप कुटुंबीयांवर निशाणा

गाडीतून काचा बंद करून फिरणाऱ्यांच्या काचा जनतेने बंद केल्या :आमदार गोगावले यांचा जगताप कुटुंबीयांवर निशाणा

गाडीतून काचा बंद करून फिरणाऱ्यांच्या काचा जनतेने बंद केल्या :आमदार गोगावले यांचा जगताप कुटुंबीयांवर निशाणा

कुणबी समाज बत्तीशी विभागाचा आमदार भरतशेठ गोगावलेना जाहीर पाठिंबा

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :- राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीचे महाड विधानसभेचे अधिकृत उमेदवार शिवसेना पक्षाचे पक्षप्रतोद आमदार भरत शेठ गोगावले त्यांना विविध जातींचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. नायक मराठा, राव मराठा, मुस्लिम, बौद्ध, नंदीवाले, देशमुख मराठा, आदिवासी यासोबतच अन्य जातींनीही आमदार गोगावले ना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. लोणारे येथे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या समर्थनार्थ 16 नोव्हेंबर 2024 रोजी कुणबी समाज बत्तीशी विभागातर्फे जाहीर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याद्वारे कुणबी समाजाने आमदार भरत शेठ गोगावले यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. दररोज मिळणाऱ्या पाठिंबामुळे आमदार भरत शेठ गोगावले यांचा विजय अधिकच सोपा होत चालला आहे.

आयोजित मेळाव्यास संबोधित करताना कुणबी समाजाचे नेते व शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण चाळके आमदार भरत शेठ गोगावले हे बहुजन समाजाचे नेते आहेत. मी आपला कुणबी बांधव शिवसेनेच्या संपर्कप्रमुख पदावर आहे याचे कारण आमदार गोगावले आहेत. आमदार गोगावले यांनी यापूर्वी झाली नव्हती अशी कोट्यावधीची विकास कामे विन्हेरे गणात केली. त्यामुळे आम्ही संपूर्ण कुणबी समाज त्यांच्या पाठीशी ठाम हॅलो उभे राहणार आहोत अशी हमी दिली.लोणारे पंचायत समिती गणात कुणबी बांधव मोठ्या संख्येने आहे. आपण इतक्या मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो, असे आमदार गोगावलेंनी प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

कोट्यावधींची विकास कामे लोणेरे पंचायत समिती गणामध्ये केली आहेत, येत्या काळात दासगाव खाडीवर 112 कोटी रकमेचा मोठा पूल आपल्यासाठी मंजूर केला आहे. त्याचे काम देखील लवकरच सुरू होईल. अनेक विकास कामे स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून केली आहेत, त्यामुळे आपण सर्वांनी असाच आशीर्वाद 20 तारखेला धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून मला द्याल, अशी विनंती उपस्थित कार्यकर्त्यांना केली.जे गाडीतून काचा बंद करून फिरतात त्यांच्या काचा जनतेने कायमच्या बंद केल्याचा टोला जगताप कुटुंबियांना लगावला.आयोजित मेळाव्यास संपर्कप्रमुख अरुण चाळके, महेंद्र तेटगुरे, राजीव साबळे,प्रताप घोसाळकर, सिताराम उभारे, प्रकाश टेंबे, समाधान करकरे, नथुराम करकरे,वामन बैकर, पंढरी शेंडगे,मात्रेत सर, रघुनाथ उभारे, सिताराम शिर्के, मुकुंद जांभरे, अभिजित टेंबे, रविंद्र टेंबे आदी मान्यवर उपस्थित होते.