बीच शॅक प्रकल्प अडकला पर्यावरण विभागाच्या लालफीतीत

30
बीच शॅक प्रकल्प अडकला पर्यावरण विभागाच्या लालफीतीत

बीच शॅक प्रकल्प अडकला पर्यावरण विभागाच्या लालफीतीत

बीच शॅक प्रकल्प अडकला पर्यावरण विभागाच्या लालफीतीत

वरसोली ,दिवेआगार येथे प्रकल्प प्रस्तावित पर्यटन वाढीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे प्रकल्प

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: अलिबाग तालुक्यातील वरसोली व श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी समुद्र कुटी (बीच रॉक) प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास येथील पर्यटन वाढीसोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे वरसोली व दिवेआगर ग्रामपंचायतीने प्रकल्प अनुषंगाने एमटीडीसीला सर्वोतोपरी सहकार्य केले आहे. मात्र पर्यावरण विभागाच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत हा अडकला असून, रॉक प्रकल्प अधांतरी राहिला आहे.
रायगड जिल्हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. येथील समुद्रकिनारी मोठ्या संख्येने नियमित पर्यटक येतात. जिल्ह्यातील पर्यटनाला आणखी चालना मिळावी यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,पालघर या जिल्ह्यात गोवा राज्याच्या धर्तीवर समुद्र कुटी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यातील वरसोली तर श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार या दोन समुद्रकिनारी प्रकल्प तयार करण्यास शासनाने मंजूर दिली.
या प्रकल्पामुळे पर्यटनास चालना मिळून स्थानिकांना रोजगार संधी आणि आर्थिक स्तर हे उंचावला जाणार होता. त्यामुळे वरसोली ग्रामपंचायत व दिवेआगार ग्रामपंचायतीने गावाच्या विकासाच्या दृष्टीने आणि पर्यटन वाढीसाठी प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करीत एमटीडीसीला जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच शासनाने दोन्ही प्रकल्पासाठी कन्सल्टंट नेमण्यात आलेले आहेत. मात्र त्यानंतर प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. समुद्र कुटी प्रकल्प हा समुद्रकिनारी होणार आहे. त्यामुळे त्याला पर्यावरण विभागाची मंजूरही आवश्यक आहे. तसेच काही ठिकाणी वन विभाग हे असल्याने त्याचीही परवानगी आवश्यक आहे. या विभागांकडून आवश्यकता परवानगी अद्याप प्राप्त झालेले नाहीत. प्रकल्पांचा रचनेनुसार केलेली बांधकाम हे समुद्रकिनारी होणार असल्याने तो नैसर्गिक आपत्ती काळात ते हलविणे सोयीस्कर असणे ही महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने योजना करून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
या प्रकल्पाचा सर्वे प्लॅन देण्याची जबाबदारी कन्सल्टंटवर आहे. वरसोली येथे ग्रामपंचायत पूर्ण मदत करीत असूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे एमटीडीसी व कन्सल्टंट कंपनीत योग्य समन्वय नसल्याने समुद्रकोटी प्रकल्पाला जागा उपलब्ध असूनही प्रकल्प कागदावरच राहिला आहे. त्यामुळे पर्यटन वाढीसाठी प्रकल्प करण्याचा हेतू अद्याप विभागाच्या आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी असफल राहिला आहे.

*अशी आहे पर्यटन कुटीची संकल्पना*

गोवा राज्य समुद्रकिनारी वाळूत खुर्चीवर बसून लाटांचा व खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो. वर्सोली आणि दिवेआगार समुद्रकिनारी 15 बाय 15 फूट उंची आणि 12 फूट उंची 20 बाय 15 असा 10 कुटी पर्यटकांच्या बसण्यासाठी बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही लावली जाणाऱ असून सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पर्यटकांना याचा वापर करता येणार आहे. कुटी मिळनाऱ्या व्यक्ती करिता परवानगीसाठी पंधरा हजार रुपये अर्जाने ना परतावा मूल्य असेल. तसेच या कुटीसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार वार्षिक शुल्क राहील. याशिवाय तीस हजार रुपये सुरक्षा अमानत जमा करावे लागेल. जी तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल. चौपाटी कुटी चालवण्यासंदर्भात पर्यटन विभागाने विविध नियम घालून दिले आहेत.