⭕ बल्लारपूर क्षेत्रात त्या रॅलीची एकच चर्चा 💥💥

220
⭕ बल्लारपूर क्षेत्रात त्या रॅलीची एकच चर्चा 💥💥

बल्लारपूर क्षेत्रात त्या रॅलीची एकच चर्चा 💥💥

⭕ बल्लारपूर क्षेत्रात त्या रॅलीची एकच चर्चा 💥💥

📍डॉ. अभिलाषा गावतूरे ह्यांच्या समर्थनार्थ उसळला जनसागर
📍भव्य अशा रोड शो च्या माध्यमातून केले बल्लारपूर शहरात शक्ती प्रदर्शन

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

बल्लारपूर : 18 नोव्हेंबर
प्रचार तोफा हळूहळू थंडावत असतानाच एक दिवसा अगोदर भव्य दिव्य असा रोड शो काढून डॉ. अभिलाषा गावतुरे ह्यांनी प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करून विरोधकांच्या छातीत अक्षरशः धडकी भरवली आहे . एकीकडे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सुधीर मुनगंटीवार यांनी पवन कल्याण सारख्या स्टार प्रचारकाला उतरवले तर दुसरीकडे डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या रोड शो च्या माध्यमातून जनतेने स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला त्यामुळे या रॅलीची एकच चर्चा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये होत आहे.
ढोल ताश्याचा गजर, आदिवासी नृत्य, व डॉली चायवाला हे रॅली चे विशेष आकर्षण ठरले.
या रॅली ची सुरुवात वस्ती परिसरातील गांधी चौक येथून होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे या रॅलीची सांगता झाशी राणी चौकामध्ये एक मोठ्या जाहीर सभेमध्ये करण्यात आली.
या सभेला सत्यशोधक समाजाचे हिराचंद बोरकुटे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, प्रचारासाठी आलेले डॉली चायवाला, व विविध समाज घटकातील मान्यवर उपस्थित होते.