जिल्ह्यात 18 लाख 50 हजार 102 मतदार करणार मतदान

44
जिल्ह्यात 18 लाख 50 हजार 102 मतदार करणार मतदान

जिल्ह्यात 18 लाख 50 हजार 102 मतदार
करणार मतदान

जिल्ह्यात 18 लाख 50 हजार 102 मतदार करणार मतदान

📍94 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद होणार

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 19 नोव्हेंबर
बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मंगळवार, 19 नोव्हेंबर रोजी पोलिंग पार्टी त्यांच्या त्यांच्या केंद्राकडे रवाना झाली. 18 लाख 50 हजार 102 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, 94 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद होणार आहे.
राजुरा विधानसभा मतदार केंद्रात 345 मतदान केंद्र, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 390, बल्लारपूर 366, ब्रम्हपुरी 319, चिमूर 314 आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 343 असे एकूण संपूर्ण जिल्ह्यात 2077 मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण 4636 बॅलेट युनीट, 2620 कंट्रोल युनीट आणि 2787 व्हीव्हीपॅटचा पुरवठा करण्यात आला आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघातील एकूण 3 लाख 25 हजार 278 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून, त्यामध्ये 1 लाख 67 हजार 895 पुरुष मतदार तसेच 1 लाख 57 हजार 381 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात 14 उमेदवार आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील एकूण 3 लाख 73 हजार 927 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून, त्यामध्ये 1 लाख 88 हजार 724 पुरुष मतदार तसेच 1 लाख 85 हजार 168 महिला मतदारांचा समावेश आहे. येथे 16 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील एकूण 3 लाख 12 हजार 355 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून, त्यामध्ये 1 लाख 58 हजार 628 पुरुष मतदार तसेच 1 लाख 53 हजार 720 महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदार संघात 20 उमेदवार निवडणूक लढत आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील एकूण 2 लाख 75 हजार 666 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून, त्यामध्ये 1 लाख 37 हजार 752 पुरुष मतदार तसेच 1 लाख 37 हजार 914 महिला मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघात 13 उमेदवार आहेत. चिमूर विधानसभा मतदारसंघातील एकूण 2 लाख 80 हजार 827 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून, त्यामध्ये 1 लाख 41 हजार 153 पुरुष मतदार तसेच 1 लाख 39 हजार 674 महिला मतदारांचा समावेश आहे. येथे 13 उमेदवार मैदानात आहेत. वरोडा विधानसभा मतदारसंघातील एकूण 2 लाख 82 हजार 49 मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून, त्यामध्ये 1 लाख 44 हजार 963 पुरुष मतदार तसेच 1 लाख 37 हजार 82 महिला मतदारांचा समावेश आहे. येथे 18 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
=== ===
📍तगडा पोलिस बंदोबस्त असणार
वरिष्ठ अधिकार्‍यांसह 2 हजार 766 पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्त व सुरक्षेकरिता तैनात केले आहेत. 1 हजार 588 गृहरक्षक, केंद्रीय निमलष्करी दलाच्या 4 पथक, राज्य राखीव पोलिस दलाच्या 2 पथक, 2 प्लॉटून, सी 60 दंगा नियंत्रण पथक व एक बॉम्बशोधक पथकाचा समावेश आहे.