अबब ! चंद्रपुरात दुचाकीच्या डिक्कीत साप 🐍 🐍

44
अबब ! चंद्रपुरात दुचाकीच्या डिक्कीत साप 🐍 🐍

अबब ! चंद्रपुरात दुचाकीच्या डिक्कीत साप 🐍 🐍

अबब ! चंद्रपुरात दुचाकीच्या डिक्कीत साप 🐍 🐍

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 20 नोव्हेंबर
दुर्गापूर येथील वेकोलिच्या उप क्षेत्रीय कार्यालयातील महिला कर्मचारी स्नेहा कांबळे यांच्या मोपेडमध्ये साप शिरताना दिसला. मोपेडमध्ये साप गेल्याने घाबरून त्यांनी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य अमित देशमुख यांना माहिती दिली. लगेच त्यांनी घटनास्थळ गाठून मोपेडमध्ये शिरलेला साप शोधून काढला. मोपेडच्या डिक्कीत दडून बसलेला साप ‘ब्रॉन्झ बैंक ट्री स्नेक’ रुखई जातीचा बिन विषारी साप असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हा साप झाडांवर जास्त वास्तव्यास राहतो. सापाला पकडून सुरक्षित जंगलात सोडताना हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, अमित देशमुख, पिंटू उईके आदी उपस्थित होते.