ग्रामपंचायत वहाळ येथे अवतरली पंढरी
मतदारांनी अनुभवला पंढरपूर वारीचा सोहळा

ग्रामपंचायत वहाळ येथे अवतरली पंढरी मतदारांनी अनुभवला पंढरपूर वारीचा सोहळा
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
८४२०३२५९८३
अलिबाग: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत वहाळ येथे मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने विशेष नियोजन करण्यात आले आहे.

उरण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी समीर वाठारकर, पनवेलचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कराड यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत वहाळ ने आल्हाददायक मतदान केंद्र तयार केले आहे. तेथे प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठुरायाच्या आषाढी वारीचे चित्र साकारण्यात आले आहे .त्यामुळे मतदारांना पंढरपूरला आल्याचे भास निर्माण होत आहे.
मतदानाचा टक्का वाढावा मतदारांनी केलेले मतदान केंद्र अधिक आकर्षक असावे या हेतूने पनवेल मध्ये देखील मॉडेल केंद्र उभारले आहे. या धर्तीवर वाहाळ मध्ये मतदान केंद्राला पंढरीचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आले आहे. पंढरीच्या विठ्ठल रुक्माई प्रतिकृती, वारकरी, डोक्यावर तुळस घेतलेली महिला, चंद्रभागा ,विविध वाद्य वाजवणारे तसेच टाळ चीपल्या घेतलेले वारकरी तसेच विविध देखावे या ठिकाणी ग्राम विस्तार अधिकारी नंदकिशोर भगत यांच्या पुढाकाराने साकारण्यात आले आहे. नंदकुमार भगत यांनी केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून मतदानासाठी आलेल्या मतदारांनी पंढरपूर वारीचा आभास झाल्याचं प्रत्यक्ष सांगितले व त्यांनी ग्राम विस्तार अधिकारी नंदकिशोर भगत यांचे विशेष कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here