बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन चंद्रपूरमध्ये “संविधान दिवस ” साजरा
बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन चंद्रपूरमध्ये “संविधान दिवस ” साजरा
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 27 नोव्हेंबर
सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन येथे २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला बजाज तंत्रनिकेतन चे प्राचार्य व्हि. एस. कोयाळ, उपप्राचार्य डी. के. चौधरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात विश्वरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून झाली. बजाज तंत्रनिकेतन चे उपप्राचार्य डी. के. चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविक मार्गदर्शनातून संविधानाची निर्मिती व उपयोगिता यावर प्रकाश टाकला. त्यानंतर भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन प्रा. पि. आर. मालखेडे यांनी केले, यावेळी त्यांनी संविधान हे अधिकार व कर्तव्य याची जाणीव करून देणारे प्रभावी माध्यम असून सर्वांनी संविधानाच्या तत्वाचे पालन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. पि. आर. मालखेडे यांनी केले, या कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वीतेसाठी सायन्स विभागाच्या प्राध्यापिका यांनी प्रयत्न केले. यावेळी बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.