सरदार पटेल महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांचे यश
📍राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सवात झाली निवड
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 27 नोव्हेंबर
येथील सरदार पटेल महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव २०२४ येथे निवड झालेली आहे. दरम्यान ही राज्यस्तरीय स्पर्धा अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे होणार आहे.
महाविद्यालयातील दीपक सिन्हा, आचल गेडाम, उमाकांत मिश्रा, श्रुती निकुरे, गायत्री जाधव व कोमल नगराळे ह्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव २०२४ येथे निवड झालेली आहे. ही राज्यस्तरीय स्पर्धा अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे येत्या ५ ते ९ नोव्हेंबरला होणार आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी .एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ अजय बेले, प्रा. संदेश पाथर्डी डॉ.सपना वेगीनवार डॉ. अनीता मतै डॉ. निलेश चीमुरकर डॉ. राजकुमार बिरादार डॉ. संजय उराडे डॉ. भारती दीखीत प्रा. लीना ठाकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ.किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी सहा विद्यार्थ्यांची युवा महोत्सवात निवड झाल्याबद्दल अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.