ट्रेलरची बसला धडक; 17 प्रवासी जखमी
📍नागभीड तालुक्यातील बामणी येथील घटना
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 27 नोव्हेंबर
बस आणि ट्रेलरमध्ये झालेल्या अपघातात बसमधील 17 प्रवासी जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजता नागभीड तालुक्यातील बामणी येथे घडली. यातील तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी ब्रम्हपुरी आणि चंद्रपूरला हलविण्यात आले. अन्य जखमींवर नागभीड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भंडारा जिल्ह्यातील पवणी आगाराची पवणी-नागभीड ही बस कन्हाळगाव मार्गे नागभीडला दररोज सोडली जाते. ही बस बामणी येथे येत असताना त्यामध्ये 22 प्रवासी होते. यावी ट्रेलर (एमएच 40, 6459) नागभीडकडून पवणीकडे जात होता. यावेळी भरधाव ट्रेलरने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत बसमधील 22 प्रवाशांपैकी 17 प्रवासी जखमी झाले.
जखमींमध्ये वैष्णव गायकवाड (16, चांदी), प्रणाली हुमणे (20, धामणी), कमला दडमल (63, कन्हाळगाव), बाबुराव दडमल (72, कन्हाळगाव), महेश पातोडे (45, डोंगरगाव), रेखा हेमणे (45, नागभीड), समिक्षा सावसाकडे (17, भिवापूर), सिंधू शेंडे (60, नागभीड), धर्मराज बागडे (50, कन्हाळगाव), प्रमोद मते (53, अड्याळ), शालू हुमणे (45, धामणी), रूद्र मगरे (14, चांदी), जयराम पुंडे (70, वरोरा), कुलदीप पाथोडे (18, डोंगरगाव), संघरत्न बागडे (21, कन्हाळगाव), पितांबर नागपुरे (55, कन्हाळगाव), सुनिता गडमडे (48, चांदी), वनंता बारेकर (32, नवखळा) आणि भारती सावसाकडे (40, भिवापूर) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती कळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर गंभीर तिघांना चंद्रपुरात हलविले. घटनेची पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत.