मुंबई गोवा महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच,आंबेवाडी नाका येथे ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच मृत्यु
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
कोलाड मुंबई गोवा महामार्गाचे करावे काय दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ मुंबई गोवा महामार्ग ६६ वरील अपघाताची मालिका सुरूच असुन सोमवार दि. २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७.१५ वा.आंबेवाडी नाका येथील शिवकांत गॅरेज व विजय वाईन शॉप दुकाना समोर ट्रेलरनी मोटारसायकल स्वराला जोरदार धडक दिल्याने या अपघातात मोटार सायकल स्वराचा जागीच मृत्यु झाला.
या बाबत कोलाड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आंबेवाडी नाका येथे आपल्या ताब्यातील ट्रेलर वाहन चालक सायरलाल खमाण गुजर वय ३३ वर्ष रा बहादूरपुरा पो. दौलतपुरा ता. मसुदा विजयनगर जि. अजमेर राजेस्थान ट्रेलर क्र आर. जे. ०६ जी. डी. ७७१४यांनी रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोटार सायकल क्र. एम एच ०३डी टी ४१४८ चालक विजय कुमार सिन्नदुराई गोकगिलिखान वय वर्ष ३७ रा. सिन्नादुराई घर क्र. २३८ स्टीट रोड व्हिएस पुरम विरथरेड डिपल्ली तामिळनाडू याला जोरदार धडक दिल्याने मोटार सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाला असुन दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याविषयी कोलाड पोलिस ठाण्यात ११३/२०२४भारतीय संहिता २०२३ नुसार कलम १०६(१)२८१, १२५, (अ)१२५ (ब )मो. वा. का. कलम १८४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असुन अधिक तपास सपोनि एस ए कुलकर्णी नागोठणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पो. अंमलदार एस जी भोजकर,अंमलदार सी. के कुथे करीत आहेत.