नोटबंदीच्या काळातील रकमेबाबत प्रशासन व तपास यंत्रणा गप्प का?
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
रायगड: नोटबंदीच्या काळात एका सुरेंद्र ला. दाडीया यांनी दिनांक ०६.०१.२०१७ रोजी अलिबाग पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती. फिर्यादीकडे नोट बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नवीन नोटा ही सापडल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्यांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. फिर्यादीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम आली कुठून.. त्यांना ही रक्कम कोणी दिली आणि जर पैसे आणले असतील तर ते कोणाचे होते. प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकरणावर कोणती कारवाई केली. तपास अधिकाऱ्यांनी फिर्यादीची चौकशी कशी केली. . आजतागायत या प्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात आलेला नाही. जर फिर्यादीने स्वतःकडे इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन नोटा ठेवलेल्या असतील, तर त्याच्यावर भ्रष्टाचार आणि देशद्रोहाचा आरोप होणे योग्य ठरते. याशिवाय, त्याला वाचवण्यासाठी कोणी मदत केली. त्यामागे कोणाचे हात आहेत याचा तपास होणे अत्यावश्यक आहे.
विरोधी पक्ष, भ्रष्टाचार निर्मूलन संस्था आणि पोलीस विभाग या प्रकरणात गप्प का आहेत? लोकांचा विश्वासघात करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. न्यायव्यवस्था डोळेझाक करत आहे का असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. निरपराध पोलीस कर्मचाऱ्यांवर अन्याय का होतो आहे. हा मुद्दाही गंभीर आहे. जनता या प्रकरणातील सत्य आणि योग्य न्याय मिळण्याची मागणी करत आहे.