जुन्या वैमनस्यातून करणार होता खून, पोलिसांच्या सतर्कतेने वाचला दोघांचा जीव

80
जुन्या वैमनस्यातून करणार होता खून, पोलिसांच्या सतर्कतेने वाचला दोघांचा जीव

जुन्या वैमनस्यातून करणार होता खून, पोलिसांच्या सतर्कतेने वाचला दोघांचा जीव

जुन्या वैमनस्यातून करणार होता खून, पोलिसांच्या सतर्कतेने वाचला दोघांचा जीव

📍 महाकाली वसाहतीतून देशी कट्टा व चार राऊंड जप्त

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 2 डिसेंबर
जुन्या वैमनस्यातून दोघांचा जीव घेण्याच्या उद्देशाने देशी कट्टा व चार राऊंड घेऊन फिरत असलेल्या एका अट्टल गुन्हेगारास शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी कट्टा व राऊंड जप्त करण्यात आले. शहर पोलिसांच्या सतर्कतेने महाकाली वसाहत परिसरातल्या आनंद नगरातील दोघांचा जीव वाचला. ही कारवाई रविवार, 1 डिसेंबर रोजी रात्री शहर पोलिसांनी केली.
विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्हा कारागृहातून हा आरोपी ‘पॅरोल’वर असल्याची बाब तपासाअंती समोर आली. त्याच्याविरूद्ध रामनगर पोलिस ठाण्यात भादंवि 224 कलमान्वये गुन्हा दाखल असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
कनैया उर्फ मुन्ना ठाकूर रघुनाथसिंग राठोड (रा. ओम नगर रयतवारी डीआरसी हेल्थ क्लब चंद्रपूर) अशी अटकेतील आरोपीचे नावे आहे. शहर पोलिस रविवारी महाकाली वसाहत परिसरात गस्तीवर होते. त्यांना आरोपी हा हातात शस्त्रसाठा घेऊन फिरत असल्याची बाब निदर्शनास आली. त्याला विचारपूस केली असता, त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी त्याने देशी कट्टा व चार राऊंड असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून देशी कट्टा व राऊंड जप्त करण्यात आले. त्याची चौकशी केली असता, गेल्या काही महिन्यांपूर्वी दोन इसमांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्याला मारहाण केली. त्याच रागातून त्यांना जीवे मारण्याचा कट आरोपीने आखला होता. त्या इसमाच्या शोधात आरोपी फिरत असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरिखक संदीप बच्छीरे, सचिन बोरकर, संतोषकुमार कनकम, कपुरचंद खैरवार, इम्रान खान, राजेश चिताडे, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, विक्रम मेश्राम यांनी केली.