कोथरूड भागातून हरवलेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह देवकुंड व्हीयु पॉईंट दरीत आढळला.
✍️आशिष प्रकाश कोठारी ✍️
रोहा तालुका प्रतिनिधी
📞7507493900📞
रोहा :- पुण्यातील कोथरूड भागातून हरवलेल्या विराज या 19 वर्षीय तरुणाचा मृतदेह ताम्हिणी घाटातील देवकुंड व्हीयु पॉईंट दरीत आढळून आले.
शनिवार (दि.30) रोजी रात्री रेसक्यू टीम आणि पोलिसांनी या तरुणाचा मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विराज ईश्वर फड वय-18 रा. कोथरूड पुणे हा तरुण हरवल्याची तक्रार पुणे पोलीस ठाणे येथे नोंदवण्यात अली होती.विराज बेपत्ता असल्याची तक्रार सोमवारीच पुणे पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात अली होती. गुरुवारी 28 तारखेला ताम्हिणी घाटात देवकुंड व्ही यू पॉईंट येथे काही पर्यटक भटकंतीसाठी आले होते.त्यावेळेस त्यांना उंच कड्याच्या शेजारी एक बॅग मिळाली.या बागेची तपासणी केली असता त्यामध्ये मोबाइल आणि कपडे सापडले.
यासंदभातील माहिती काही महिला प्लस व्हली हॉटेलमध्ये देऊन पर्यटक निघून गेले.
सदर माहिती मिळताच मुळशी पोलीस ठाण्यातील अधिकारी महेश पवार यांनी बंध मोबाइल सुरु केले.
तेव्हा हा मोबाइल विराजचा असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर शोध कार्याला गती मिळाली.बऱ्याच तासानंतर विराज चा मृतदेह रेसक्यू टीमला सापडला,दरी मध्ये एका
झाडाखाली विराजचा मृतदेह आढळून आले.
या शोधमोहीमेमध्ये S.V.R.S.S वन्य जीव सामाजिक संस्था कोलाड, शेलार मामा रेसक्यू टीम यांनी मोलाची भूमिका बजावली.
विराजचा शोध घेण्यासाठी ड्रोनबरोबर आधुनिक उपकरनाचा वापर करण्यात आला.या प्रकरण मधील पुढील तपास पोलीस करीत आहेत.